Happy Birthday Narendra Modi : 'या' पाच पदार्थांचे मोदी आहेत दिवाने

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 09:43 AM2018-09-17T09:43:29+5:302018-09-17T09:53:52+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाराणसीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मोदी काही पदार्थांचे दिवाने आहेत हे फारच कमी लोकांना माहित आहे. मोदींना आवडणारे हे पदार्थ कोणते ते जाणून घेऊया.

न्यूट्रिशियनने परिपूर्ण असलेला खमंग ढोकळा हा गुजरातमधील एक प्रसिद्ध पदार्थ असून मोदींना तो प्रचंड आवडतो. ढोकळा खाण्यासाठी जितका स्वादिष्ट असतो तितकाच तो पोषकही आहे.

गुजरातमध्ये खिचडीला ऊंधीयो म्हटलं जातं. खिचडी ही नरेंद्र मोदींना खूप आवडते. मोदींच्या आवडत्या पदार्थांच्या लिस्टमध्ये खिचडीचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो.

बेसनाची खांडवी या पदार्थाचे ही मोदी दिवाने आहेत. खांडवी हा पदार्थ केवळ देशातच नाही तर विदेशातही प्रसिद्ध आहे. मोदींचा हा आवडता पदार्थ तुम्हीही तुमच्या पोषक आहारात सामिल करू शकता.

श्रीखंड हे सर्वांच्याच आवडीचं. मोदींनाही केशर-बदाम श्रीखंड प्रचंड आवडतं. सण-समारंभात अनेकांच्या घरी श्रीखंड पुरीचा बेत आखला जातो.

भेंडी कढी ही नरेंद्र मोदींची सर्वात आवडती डिश असल्याचं म्हटलं जातं. बेसनमध्ये भेंडी टाकून ही स्वादिष्ट कढी तयार केली जाते. गुजरातची ही प्रसिद्ध डिश तुम्ही तुमच्या घरी ही करू शकता.