शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gujarat Election 2022: भाजपा, काँग्रेस, आपमध्ये अटीतटीची लढाई, गुजरात कोण जिंकणार? फायनल ओपिनियन पोलमधून दिसला धक्कादायक कल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 9:35 AM

1 / 6
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. नेहमी काँग्रेस आणि भाजपा यांच्यात होणाऱ्या या निवडणुकीत यंदा आपनेही जोरदारपणे सहभाग घेतल्याने रंगत वाढली आहे.
2 / 6
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २७ वर्षे सत्तेवर असलेला भाजपा आपली सत्ता टिकवण्यासाठी तर काँग्रेस सत्तापरिवर्तनासाठी संघर्ष करत आहे. तर अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये चमत्कार करण्याची आस बाळगून आहे.
3 / 6
दरम्यान, गुजरातमधील मतदानाला काही दिवस उरले असताना काही वृत्तवाहिन्यांनी फायनल ओपिनियन पोल जाहीर केले आहेत. एबीपी न्यूज-सी वोटरने जाहीर केलेल्या ओपिनियन पोलमधून गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
4 / 6
या ओपिनियन पोलनुसार १८२ जागा असलेल्या गुजरातमध्ये भाजपाला ४६ टक्के, काँग्रेसला २७ टक्के, आपला २१ टक्के आणि इतरांना ६ टक्के मते मिळू शकतात.
5 / 6
तर जागांचा विचार केल्यास भाजपाला १८२ पैकी १३४ ते १४२ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला २८ ते ३६ आणि आपला ७ ते १५ जागा मिळू शकतात. इतरांच्या खात्यामध्ये ० ते २ जागा जाऊ शकतात.
6 / 6
इंडिया टीव्ही-मॉटराईजनेही ओपिनियन पोल जाहीर केला आहे. या ओपिनियन पोलनुसार गुजरातमध्ये एकूण १८२ जागांपैकी भाजपाला ११७ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला ५९ आणि आपला ४ तर इतरांना २ जागा मिळू शकतात.
टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाcongressकाँग्रेसAAPआप