अयोध्येत साडेपाच लाख दिवे उजळून विश्वविक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 21:33 IST2019-10-26T21:25:21+5:302019-10-26T21:33:12+5:30

दिवाळीनिमित्त अयोध्येत साडेपाच लाख दिव्यांनी लखलखाट करण्यात आला.
प्रज्वलित केलेल्या दिव्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली असून अयोध्येने हा विश्वविक्रम केला आहे.
या दीपोत्सवात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाची तयारी खूप आधीपासून करण्यात येत होती.
लाखो दिवे पेटले तेव्हा त्यांच्या लखलखाटाने अतिशय नयनरम्य दृश्य तयार झाले.
अयोध्या साडेपाच लाख दिव्यांनी उजळण्यासाठी डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांनी राम की पैडी आणि इतर घाटांवर दिवे प्रज्वलीत करण्याचे काम केले.
गेल्या दोन वर्षांपासून योगी सरकार अयोध्येत दीपोत्सव साजरा करत आहे.