1 / 5लग्नसराईचा हंगाम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्यने चढ-उतार होत आहे.2 / 5जागतिक बाजारपेठेतील अनुकूल ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर आज भारतात सोन्याच्या भावात १ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. एमसीएक्सवर सोन्याचे फ्युचर्स १.३१ टक्क्यांनी वाढले किंवा ६६४ रुपयांनी वाढून ५१,२७४ रुपये प्रति १० ग्रॅम झाले. 3 / 5चांदीचा वायदा २.८२ टक्क्यांनी वाढून १,७५३ रुपयांनी ६३,८६७ रुपये प्रति किलोवर गेला. 4 / 5विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. 5 / 5लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं.