Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण होण्याचा अंदाज; चांदीचा भाव मात्र वाढला, पाहा आजचे दर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 03:04 PM2021-08-18T15:04:03+5:302021-08-18T15:12:26+5:30

Gold Rate Today: प्रति 10 ग्रॅम 45,600 रुपयांच्या 4 महिन्यांच्या नीचांकावर घसरल्यानंतर सोन्याच्या किमतीत सुधारणा झाली.

कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारांमध्ये वाढ झाल्यामुळे आर्थिक घसरणीच्या वाढत्या चिंतेमुळे आज जागतिक बाजारात सोन्याचे भाव वाढलेत, परंतु डॉलरच्या मजबुतीमुळे त्याचा फायदा कमी झाला. मागील सत्रात युरोच्या तुलनेत नऊ महिन्यांचा उच्चांक गाठल्यानंतर डॉलर इतर प्रमुख चलनांच्या तुलनेत जास्त राहिला.

प्रति 10 ग्रॅम 45,600 रुपयांच्या 4 महिन्यांच्या नीचांकावर घसरल्यानंतर सोन्याच्या किमतीत सुधारणा झालीय, परंतु मौल्यवान धातू अद्यापही गेल्या वर्षीच्या 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या विक्रमी उच्चांकापासून 9,000 रुपयांनी कमी झाली.

मागील सत्रात सोने स्थिर किमतीवर बंद झाले होते, तर चांदी 0.5 टक्क्यांनी कमी झाली होती. चांदी सोन्यासारखी वाढलीय. सप्टेंबर फ्युचर्समध्ये चांदीचे भाव 0.37 टक्क्यांनी वाढले.

बुधवारी एमसीएक्सवरील ऑक्टोबर वायदा सोने 94 रुपयांनी वाढून 47,374 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर सप्टेंबर फ्युचर्स चांदीचा भाव 236 रुपयांनी वाढून 63,462 रुपये प्रति किलो झाला. मंगळवारी जागतिक बाजारात पुनर्प्राप्तीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून आला. यामुळे मंगळवारी सोने 446 रुपयांनी आणि चांदी 888 रुपयांनी वाढली.

दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा बंद भाव 46,460 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा भाव 62,452 रुपये प्रति किलो होता. तसेच येत्या काही दिवसांत सोन्यात मोठी घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.

लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.