बालपणापासून होते सैनिकी गणवेशाचे आकर्षण, अशा आहेत हवाई दलाच्या पहिल्या महिला फ्लाइट इंजिनिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 07:55 PM2019-02-28T19:55:30+5:302019-02-28T20:04:47+5:30

भारतातील महिला शक्ती आता सर्वच क्षेत्रात आपली उपस्थिती दर्शवत आहे. अगदी लष्करी सेवेमध्येही आता महिलांचा सहभाग वाढत आहे. असंच एक कर्तबगार नाव म्हणजे हवाई दलातील पहिल्या महिला फ्लाइट इंजिनिअर हीना जयसवाल

पंजाबची राजधानी चंदिगड येथील रहिवासी असलेल्या हीना यांनी बालपणापासूनच लष्करी सेवेत जाण्याचे स्वप्न पाहिले होते. अखेर अथक परिश्रमांच्या जोरावर त्यांनी हे स्वप्न साकार केले.

हीना या याचवर्षी हवाई दलामध्ये प्लाइट लेफ्टनंट म्हणून दाखल झाल्या आहेत. तसेच फ्लाइट इंजिनियर म्हणून त्या ऑपरेशनल हेलिकॉप्टर युनिटमध्येही सहभागी होणार आहेत.

हीना यांनी बंगळुरूमधील येलहांका येथील 112 हेलिकॉप्टर एअरफोर्स स्टेशन येथे फ्लाइट इंजिनियरचे शिक्षण घेतले आहे.