Unlock 1 मध्ये इंजिन धावणार, 1 जूनपासून २०० विशेष रेल्वेगाड्या सुटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 05:03 PM2020-05-31T17:03:37+5:302020-05-31T17:31:26+5:30

रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार १ जूनपासून विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. १२ मेपासून चालविण्यात येणाऱ्या विशेष वातानुकूलित गाड्यांच्या व्यतिरिक्त या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

प्रवाशांच्या सुविधेसाठी ३१ मेपासून ३० दिवसांऐवजी १२० दिवस आधी या गाड्यांचे आरक्षण करता येणार आहे.

लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वे 1 जूनपासून 200 अतिरिक्त गाड्या चालवणार आहे, त्या एसी नसलेल्या असतील.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही ट्विटद्वारे याची माहिती दिली आहे. आधीपासून कार्यरत 30 गाड्यासुद्धा या २०० गाड्यांसह सुरू राहतील.

रेल्वेने चार महिन्यांपूर्वीच या गाड्यांसाठी अ‍ॅडव्हान्स तिकिटांची बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच तात्काळ कोट्यातून तिकिट बुकिंग सुरू झाले आहे.

रविवारी आधीच्या एक महिन्यापूर्वी अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे नियम बदलले जातील. तसेच मधल्या स्थानकांवरून तिकिट बुकिंगची सेवा 31 मे रोजी सकाळी तिकीट काऊंटर व ऑनलाइन सेवेद्वारे सुरू करण्यात आली आहे.

प्रवाशांना या गाड्यात प्रवास करण्यासाठी ९० मिनिटे अगोदर रेल्वे स्थानकावर यावे लागले, तेथे स्क्रिनींग केल्यानंतरच प्रवाशांना गाडीत बसता येईल.

सोशल डिस्टन्स आणि मास्क हे बंधनकारक असणार आहे, ऑनलाईन सेवेसह काऊंटरवरही तिकीट सुविधा उपलब्ध असणार आहे

केवळ रिझर्व्हेशन कन्फर्म आणि आरएसी असलेल्या प्रवाशांनाचा रेल्वे स्थानकावर प्रवेश मिळणार आहे, मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप असणे बंधनकार आहे.

या रेल्वेतील प्रवासात प्रवाशांना चादर, उशी किंवा इतर सुविधा मिळणार नाहीत