आशिया, आफ्रिकेतून येत असलेल्या संकटामुळे हिमालय धोक्यात, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

By बाळकृष्ण परब | Published: October 9, 2020 04:47 PM2020-10-09T16:47:09+5:302020-10-09T17:01:00+5:30

Himalaya News : हिमालयीन पर्वतरांगांमधील बर्फ हे आशिया आणि आफ्रिकेमधून येत असलेल्या संकटामुळे धोक्यात आले असल्याचे समोर येत आहे.

भारताच्या उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पसरलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगा ह्या देशाला नैसर्गिक आणि मानवनिर्मित आक्रमणापासून वाचवत आलेल्या आहेत. मात्र या हिमालयीन पर्वतरांगांमधील बर्फ हे आशिया आणि आफ्रिकेमधून येत असलेल्या संकटामुळे धोक्यात आले असल्याचे समोर येत आहे.

आशिया आणि आफ्रिकी प्रदेशामधील मोठ्या प्रमाणावरील प्रदूषण आणि धुळीमुळे हिमालयातील बर्फ वेगाने वितळत आहे. एका नव्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. पश्चिम हिमलयातील उंच पर्वतांवर वाहत येणारी धूळ ही हिमालयाती बर्फ वेगाने विरघळण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

नेचर क्लायमेंट चेंजमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार बर्फाच्छादित असलेल्या हिमालयातील पर्वतागांमध्ये हवेद्वारे वाहत येणारी धूळ बर्फ वितळवण्याच्या प्रक्रियेला वेग देऊ शकते. त्याचं कारण म्हणजे धूळ सूर्यप्रकाश शोषून घेऊ शकते. त्यामुळे आजूबाजूचे क्षेत्र गरम होऊ शकते.

संशोधनामधून समोर आले की, आफ्रिका आणि आशिया खंडामधील काही भागांमधून शेकडो मैल दूर उडणारी धूळ अधिक उंचावर उतरल्याने त्याचा हिमालयीन क्षेत्रातील बर्फ वितळवण्याच्या प्रक्रियेवर त्याचा व्यापक प्रभाव पडतो. संशोधनामधून हा दावा करणाऱ्यांमध्ये यूं किसान, यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी च्या पॅसिफिक नॉर्थवेस्ट नॅशनल लेबॉरेटरीमध्ये वातावरणाबाबतचे संशोधक आहेत.

त्यांनी सांगितले की, वेगाने बर्फ वितळणारी बर्फाची शिखरे ही चिंतेची बाब आहे. नियमित बर्फ वितळणे हा नैसर्गिक रचनेचा भाग आहे. हिमनगामधून जो बर्फ वितळतो. त्यामुळे पाणी वाहून खाली येते आणि नद्यांमध्ये प्रवाहित होते. हे नैसर्गित वितळण्याच्या प्रक्रियेमधून होते. एका अंदाजानुसार दक्षिण पूर्ण आशियामध्ये सुमारे ७० कोटी लोक हे आपल्या पाण्याच्या गजरेसाठी हिमालयातील बर्फावर अवलंबून आहेत.

गंगा, ब्रह्मपुत्र, यांग्त्झी आणि हुआंगसह भारत आणि चीनमधील प्रमुख नद्या ह्या हिमालयातच उगम पावतात त्यामुळे या सारख्या संशोधनाचे विश्लेषण करणे महत्त्वपूर्ण आहे. की या भागाता बर्फ वितळण्याची प्रक्रिया ही पूर्वी प्रमाणेच आहे की नाही आणि जर यामध्ये बदल झाला असेल तर तो का झाला आहे.