डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 10:19 AM
1 / 17 मी अशा धर्माला मानतो जो धर्म, स्वतंत्रता, समानता आणि बंधुता शिकवतो. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर 2 / 17 जर मला असं वाटलं की संविधानाचा दुरूपयोग केला जात आहे, तर मी ते सर्वात आधी मी जाळेन. – डॉ.बाबासाहेब आंबेडकर 3 / 17 जीवन लांब असण्यापेक्षा ती महान असावं. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर 4 / 17 आपण सर्वात आधी आणि सर्वात शेवटी भारतीय आहोत. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर 5 / 17 बुद्धीचा विकास हा मानव अस्तित्वाचं प्रथम लक्ष्य असलं पाहिजे. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर 6 / 17 जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणा अभावी जिवंतपणी दुस-याचा गुलाम होतो. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर 7 / 17 माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर 8 / 17 काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर 9 / 17 माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 10 / 17 मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 11 / 17 तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर 12 / 17 आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर 13 / 17 स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा ! - डॉ.बाबासाहेब आंबेडकर 14 / 17 लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर 15 / 17 शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर 16 / 17 लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर 17 / 17 देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणखी वाचा