शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Donald Trump's India Visit : कौन है वो?... ट्रम्प-मोदी-मेलानिया यांच्यासोबत रेड कार्पेटवर चालणाऱ्या 'ती'ची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 5:27 PM

1 / 10
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जादू की झप्पी देत नेहमीप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत केलं आहे.
2 / 10
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या पत्नी मेलानिया आणि मुलगी इवांका ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत. ट्रम्प-मोदी-मेलानिया यांच्यासोबत रेड कार्पेटवर असणाऱ्या एका महिलेने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.
3 / 10
गुरदीप कौर चावला असं या महिलेचं नाव असून त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भाषांतर करण्याचं (इंटरप्रेटर) काम करतात. रेड कार्पेटवर चालणाऱ्या गुरदीप कौर चावला यांची आज जोरदार चर्चा रंगली आहे.
4 / 10
परदेश दौऱ्यावेळी जेव्हा पंतप्रधान मोदी हिंदीमध्ये भाषण देतात तेव्हा गुरदीप त्याचं इंग्रजी भाषेत भाषांतर करतात. तसेच अनेकदा त्या मोदींसोबत भारतामध्ये परदेशी नेत्यांच्या दौऱ्यादरम्यान सोबत असतात.
5 / 10
पंतप्रधान मोदींनी हिंदीमध्ये भाषण केल्यानंतर गुरदीप कौर चावला त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करतात. जेणेकरून जगभरातील नेत्यांना मोदींनी केलेलं हिंदीतील भाषण समजण्यास मदत होते.
6 / 10
1990 मध्ये गुरदीप यांनी संसदेतून आपल्या करिअरला सुरुवात केली. मात्र काही काळानंतर त्या आपल्या पतीसोबत अमेरिकेमध्ये शिफ्ट झाल्या.
7 / 10
2010 मध्ये अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांसोबत त्या भारतात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्यासाठी भाषांतर करण्याचं काम केलं होतं.
8 / 10
2014 मध्ये मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमातही गुरदीप सहभागी झाल्या होत्या. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि ओबामा यांच्यामध्ये इंटरप्रेटरचं काम केलं आहे.
9 / 10
गुरदीप कौर चावला यांना सर्व भाषेचं खूप ज्ञान आहे. त्यामुळेच त्यांना एक उत्तम ट्रान्सलेटर मानलं जातं.
10 / 10
पंतप्रधान मोदी जेव्हा दौरा करतात तेव्हा गुरदीप स्थानिक भाषेच्या माध्यमातून तेथील लोकांना कनेक्ट करतात. त्यामुळे अनेकदा परदेश दौऱ्यादरम्यान मोदींसोबत त्या असतात.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतAmericaअमेरिका