Delhi Red Fort Blast : महत्त्वाचे ते तीन तास! स्फोटकांनी भरलेली गाडी पार्किंगमध्ये ठेवली; त्यानंतर दहशतवादी उमर कोणाला भेटला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 14:30 IST2025-11-11T14:13:17+5:302025-11-11T14:30:20+5:30
Delhi Red Fort Blast : सोमवारी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोटात नऊ जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. एजन्सी आता अनेक प्रमुख घटकांची चौकशी करत आहेत. दिल्लीत आल्यानंतर, डॉ. उमर याने त्याची कार लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये तीन तास पार्क केली.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या चौकशीत दिल्ली पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी अनेक महत्त्वाच्या बाबींवर काम केले आहे. बदरपूर मार्गे दिल्लीत आल्यानंतर, डॉ. उमर यांनी त्यांची कार लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये तीन तास पार्क केली. तर, उमर गाडी पार्क करताना कुठे होता? तो पार्किंगमध्ये होता का, की त्या तीन तासांत तो कोणाला भेटत होता? की तो त्या परिसराची रेकी करत होता आणि गर्दीची वाट पाहत होता?

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणे धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी अनेक महत्त्वाच्या बाबींवर काम केले आहे. बदरपूर मार्गे दिल्लीत आल्यानंतर, डॉ. उमर याने तयांची कार लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये तीन तास पार्क केली.

तर, उमर गाडी पार्क केल्यानंतर तो कुठे होता? तो पार्किंगमध्ये होता का, की त्या तीन तासांत तो कोणाला भेटला होता? की तो त्या परिसराची रेकी करत होता आणि गर्दीची वाट पाहत होता? या प्रश्नांची उत्तरे तपास यंत्रणा घेत आहेत.

ही गाडी दुपारी ३.१९ वाजता पार्किंगमध्ये आली. त्यानंतर ती संध्याकाळी ६:२२ वाजता बाहेर आली. या तीन तासांत, उमर कोणाशी बोलला का? त्याला कोणाकडून सूचना येत होत्या का? की तो कोणाच्या सूचनांची वाट पाहत होता?, याबाबत तपास सुरू आहे.

उमरला माहित होते की त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे आणि पोलिस कधीही त्याच्यापर्यंत पोहोचू शकतात. मग त्याने दिल्लीच्या सर्वात सुरक्षित क्षेत्रात तीन तास राहण्याचा धोका का पत्करला? त्याला स्लीपर सेलचा पाठिंबा होता की लॉजिस्टिक सपोर्टचा?

सोमवारी संध्याकाळी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा स्फोट भीषण होता.

स्फोट झालेल्या आय-१० कारजवळ उभ्या असलेल्या इतर वाहनांचेही नुकसान झाले. स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत, यामध्ये स्फोटानंतर काही अंतरावर असलेली बाजारपेठ हादरताना आणि लोक गोंधळलेल्या अवस्थेत पळून जाताना दिसत आहेत.

















