Corona Vaccination : अरे व्वा! कोरोना लसीकरणाचा नवा रेकॉर्ड; एका दिवसात तब्बल 69 लाख लोकांनी घेतली लस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 07:31 PM2021-06-21T19:31:34+5:302021-06-21T19:48:18+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे.

कोरोनाचा जगभरात हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 17 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. याच दरम्यान सर्वच देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 2,99,35,221 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 53,256 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1422 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,88,135 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे.

देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू करण्यात आलं आहे. सोमवारी एका दिवसात तब्बल 69 लाख लोकांनी कोरोनाची लस घेतली असून आतापर्यंतचा हा आकडा सर्वाधिक असल्याची माहिती मिळत आहे.

देशात कोरोना लसीकरणाचा नवा रेकॉर्ड झाला आहे. देशातील आरोग्याविषय संशोधनासाठी आयसीएमआर ही एक प्रमुख संस्था आहे. 20 जूनपर्यंत देशात 28 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे म्हणजेच आयसीएमआरचे सभासद असणाऱ्या गिरिधर बाबू यांनी या लसीकरणाच्या माध्यमातून देशात करोनामुळे निर्माण झालेला गोंधळ संपुष्टात येण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशवासीयांचं केंद्र सरकारतर्फे आजपासून मोफत लसीकरण केलं जात आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिली.

अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये एका लसीकरण केंद्राचा दौरा केला. त्यानंतर ते बोलत होते. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांच्या मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे."

"आम्ही सर्व देशवासीयांचं लसीकरण करण्याचं आमचं ध्येय लवकरच गाठणार आहोत. केंद्र सरकारनं जुले आणि ऑगस्ट महिन्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे" असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या विरोधात एक महत्त्वपूर्ण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी 18 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांच्या मोफत लसीकरणाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे," असंही ते यावेळी म्हणाले.

"सोमवारी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्तानं देशात सर्वाच्या मोफत लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. भारत हा लसीकरणात आघाडीवर आहे. आम्ही सर्व देशवासीयांच्या लसीकरणाचं लक्ष्य लवकरात लवकर पूर्ण करू," असंही शहा यांनी स्पष्ट केलं आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्दी, खोकला झाला तरी कोरोनाची लक्षणं तर नाहीत ना? अशी शंका अनेकांच्या मनात डोकावत असते. मात्र आता एक असा अलार्म तयार करण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या आजुबाजूला असणाऱ्या रुग्णांची माहिती मिळणार आहे.

तुमच्या आजूबाजूला एखादा कोरोना रुग्ण असेल तर तुम्हाला तो धोक्याची घंटा देणार आहे. ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी सीलिंक माउंटेड कोविड अलार्म तयार केला आहे. जो रुममधील कोरोनाबाधित व्यक्तीबद्दल 15 मिनिटांत माहिती देईल, असा दावा ब्रिटीश संशोधकांनी केला आहे.

द संडे टाईम्सच्या रिपोर्टनुसार, कोरोनाग्रस्तांबद्दल माहिती देणारं हे उपकरण येत्या काळात विमानातील केबिन, शाळा , केअर सेंटर आणि घर तसंच कार्यालयांमध्ये स्क्रिनिंगसाठी बसवता येईल. या उपकरणाचा आकार स्मोक अलार्मपेक्षा थोडा मोठा असणार आहे.

लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन आणि डरहॅम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यावर केलेल्या संशोधनाचे प्राथमिक निकाल आशादायी आहेत. डिव्हाईसमधील परिणामाची अचूकता पातळी 98-100 टक्के पर्यंत प्रभावी आहे, असं संशोधकांनी टेस्टिंगनंतर सांगितलं.

केंब्रिजशायरमधील फर्म रोबो साइंटिफिकने तयार केलेला हा सेन्सर त्वचेद्वारे निर्मित रसायनं शोधून कोरोनाबाधित व्यक्ती ओळखू शकतो. हा सेन्सर कोरोना विषाणूमुळे संक्रमित लोकांच्या श्वासामध्ये असलेल्या रसायनांचं परीक्षण करून निकाल देतो म्हणजेच ती व्यक्ती कोरोनाबाधित आहे की नाही, हे सांगतो.

हा सेन्सर कोरोनाग्रस्त व्यक्तींना शोधू शकतो. बाधिताला कोरोनाची कोणतीही लक्षणं नसली तरी हा सेन्सर अचूक शोध घेऊ शकतो असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. भारतात अधिकाधिक लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्यासाठी सरकार सर्वोतोपरीचे प्रयत्न करत आहे.