CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊननंतर चिमुकल्यांची होईल भयानक अवस्था?; नोबेल विजेते म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 03:25 PM2020-05-19T15:25:45+5:302020-05-19T16:17:36+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना संकटाचा जगभरात आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण आला आहे. त्याचा परिणाम लहान मुलांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांवर होण्याची शक्यता आहे.

जगभरातील अनेक देश हे कोरोना संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र लॉकडाऊन संपल्यानंतरही काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

कोरोना संकटाचा जगभरात आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण आला आहे. त्याचा परिणाम लहान मुलांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांवर होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊननंतर लहान मुलांना अधिक त्रास होऊ शकतो. चिमुकल्यांची सर्वात भयानक अवस्था असेल अशी चिंता नोबेल विजेत्यांनी व्यक्त केली आहे.

20 देशांचे अर्थमंत्री आणि सेंट्रल बँकांचे गव्हर्नर्स यांच्या जी-20 समूहाकडे लहान मुलांसाठी एक ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे.

जगभरातील 85 नोबेल विजेते, माजी राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचे दोन माजी अध्यक्ष यांनी ही मागणी केली आहे. यामध्ये भारतातर्फे कैलाश सत्यार्थी आणि दलाई लामा यांचा समावेश आहे.

लॉरिएट्स अँड लीडर्स फॉर चिल्ड्रन्स संस्थेच्या अंतर्गत हे आवाहन करण्यात आलं आहे. लॉकडाऊननंतर विशेषत: लहान मुलांची अवस्था ही जास्त खराब होईल असं मत त्यांन व्यक्त केलं आहे.

चाइल्ड ट्रॅफिकिंग (child trafficking) आणि लहान मुलांसंबंधी गुन्हे वाढू शकतात. घरात काम करणाऱ्या मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारातही वाढ होऊ शकते.

नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांनी हे बजेट जगातील त्या वंचित वर्गाच्या 20 टक्के मुलांवर खर्च होईल. यामार्फत शिक्षण, पाणी, सॅनिटेशन आणि आरोग्यासारख्या सुविधा पुरवल्या जातील असं म्हटलं आहे.

लॉकडाऊन संपल्यानंतर चाइल्ड ट्रॅफिकिंगची सर्वात मोठी समस्या येईल महत्त्वाची आहे. घर, हॉटेल आणि ढाब्यांवर पुन्हा लहान मुलांची संख्या वाढू शकते असं देखील सत्यार्थी यांनी सांगितलं.

घरात अडकलेल्या मुलांना लैंगिक शोषण आणि घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागू शकतो. मुलांना आपलं शिक्षण मध्येच सोडावं लागू शकतं.

परिस्थितीचा फायदा घेऊन छोट्या कारखान्यात बालकामगार वाढवले जातील. रेड लाइट एरियातही मुलांना भीक मागायला लावली जाऊ शकते.

मुलांना वापर रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमधील मोबाईल, लॅपटॉप आणि पर्स चोरण्यासाठी होऊ शकतो. सध्या याचं प्रमाण कमी आहे. मात्र लॉकडाऊननंतर हे वाढू शकतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोना संकटामुळे आरोग्य यंत्रणांवर आलेल्या दबावामुळे नियमित सेवांवर परिणाम झाला आहे. याचा मोठा फटका लहान मुलांना बसू शकतो, असा धोक्याचा इशारा युनिसेफने काही दिवसांपूर्वी दिला होता.

कोरोना संकटाचा मोठा परिणाम लहान मुलांवर होईल. बालमृत्यूदरात मोठी वाढ होईल. पाच वर्षांखालील मुलांना याचा मोठा फटका बसेल.

लहान मुलांना आरोग्य सेवा देण्यासाठी 1.6 अब्ज डॉलरच्या मदतीची आवश्यकता असल्याचं युनिसेफनं म्हटलं आहे.

'कोरोना संकटामुळे लहान मुलांच्या आरोग्य सेवांवर परिणाम झाला आहे. याबद्दल तत्काळ पावलं न उचलल्यास पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांना मृत्यूचा धोका वाढेल. पुढील 6 महिने दररोज 6 हजारहून अधिक मुलांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे,' अशी भीती युनिसेफच्या कार्यकारी संचालिका हेन्रिटा फोरे यांनी बोलून दाखवली.