"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 10:31 AM2024-05-04T10:31:31+5:302024-05-04T10:32:42+5:30

Lok Sabha Election 2024 Congress And Smriti Irani :

Lok Sabha Election 2024 congress ajay rai said after elections Smriti Irani send to goa | "स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"

"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"

उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय शुक्रवारी कौदिराममध्ये आघाडीचे काँग्रेस उमेदवार सदल प्रसाद यांच्या केंद्रीय निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी अजय राय यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. "संपूर्ण राज्यात आणि देशात इंडिया आघाडी निश्चितपणे निवडणूक जिंकणार आहे. इंडिया आघाडीला विजयी करण्यासाठी सर्वजण पूर्ण ताकदीने उतरले आहेत. राहुल गांधी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संपूर्ण राज्यात आणि देशात आज उत्साहाचे वातावरण आहे. सर्वजण मिळून भारत आघाडी मजबूत करत आहेत आणि निवडणुका जिंकत आहेत" असं म्हटलं आहे. 

अजय राय यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. "गांधी घराणं कोणालाही घाबरत नाही. अमेठी निवडणुकीनंतर किशोरीलाल शर्मा स्मृती इराणींना गोव्यात पाठवणार आहेत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. देशातील सर्व बनावट लोकांना हटवा आणि आघाडीच्या उमेदवारांना निवडणुकीत विजयी करा. तुम्हा सर्वांना सर्व बनावट लोकांना बाहेर काढायचं आहे" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. 

काँग्रेसचे उमेदवार सदल प्रसाद यांच्या विरोधाच्या प्रश्नाला उत्तर देताना अजय राय म्हणाले की, येथे सर्वजण एकत्र काम करत आहेत. कोणी विरोध करत नाही. सर्वांना समजावून सांगितलं आहे. येत्या काळात प्रत्येकजण सतल प्रसादजींच्या पाठीशी उभा दिसणार आहे. गोरखपूरमध्ये कोणताही परिणाम होणार नाही. सर्वजण मिळून काम करत आहेत. राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढविणाऱ्या रवि किशन यांच्या टीकेला अजय राय यांनी प्रत्युत्तर दिलं आणि म्हटलं की राहुल गांधी आणि गांधी कुटुंब कोणालाही घाबरत नाही. किशोरीलाल शर्मा अमेठीमधून निवडणूक जिंकणार आहेत.

बांसगांवच्या बघराई गावाजवळ जाहीर सभेला संबोधित करताना अजय राय म्हणाले की, आम्ही पंतप्रधानांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. असे अनेक मित्र इथे आहेत जे बनारस आणि गोरखपूरमध्ये आघाडीच्या निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. निवडणुकीत आघाडीचे उमेदवार सदल प्रसाद यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी बांसगांवच्या जनतेला केलं. त्यांनी जे वचन दिले आहे ते नक्कीच पूर्ण करतील. अजय राय निवडणुकीत विजयी झाले तर काँग्रेसची प्रतिष्ठा वाढेल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. त्यामुळे राहुल गांधींची प्रतिष्ठाही वाढणार आहे. अखिलेश यादव आणि अंबिका चौधरी यांची प्रतिष्ठाही वाढणार आहे असंही म्हटलं. 
 

Web Title: Lok Sabha Election 2024 congress ajay rai said after elections Smriti Irani send to goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.