शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 8:30 AM

1 / 15
कोरोना व्हायरसने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. सातत्याने वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येने चिंतेत भर पडत आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे.
2 / 15
जगभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर सात लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांची संख्या ही 21,824,807 वर पोहोचली आहे.
3 / 15
तब्बल 773,032 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर देशातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे.
4 / 15
देशातील कोरोनाबाधितांची संख्य़ा भयावह स्थितीत असून दिवसाला 60 हजार पेक्षा अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. त्यापेक्षा अधिक भीतीदायक मृत्यूंची संख्या आहे.
5 / 15
एकूण कोरोना बळींची संख्या 50000 होण्यासाठी केवळ 20 मृत्यू कमी आहेत. देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 63,489 नव्या रुग्णांची भर पडली. तर 944 जणांचा मृत्यू झाला आहे.
6 / 15
60 हजारपेक्षा जास्त रुग्ण सापडणारा हा सलग नववा दिवस आहे. संक्रमितांचा एकूण आकडा 25 लाख 89 हजारांवर गेला आहे. मात्र याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
7 / 15
बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा 18 लाखांवर गेला आहे. तसेच कोरोना चाचण्यांमध्येही वाढ झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताचा मृत्यूदर हा कमी आहे.
8 / 15
भारताचा मृत्यू दर हा सध्या 1.93 टक्के आहे. मात्र तो कमी देखील होत आहे. मोठ्या प्रमाणात देशात सुरू असलेल्या चाचण्यांमुळे मृत्यू दरात घट होत असल्याचं म्हटलं जात आहे.
9 / 15
कोरोना चाचणीमुळे रुग्णांची माहिती लवकर मिळण्यास मदत होत आहे. तसेच त्यामुळे उपचारही लवकरात लवकर केले जात आहे. त्यामुळे बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे.
10 / 15
आयसीएमआरने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 15 ऑगस्टपर्यंत एकूण 2,93,09,703 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. शनिवारी एकाच दिवसात 7,46,608 चाचण्या करण्यात आल्या.
11 / 15
रविवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत झालेल्या मृत्यूमुळे एकूण मृतांचा आकडा 49,980 झाला आहे. तर अनेकांवर उपचार सुरू आहेत.
12 / 15
एकूण कोरोनाबाधितांपैकी 6,77,444 लोकांवर उपचार सुरु आहेत. 18,62,258 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामध्ये काही परदेशी नागरिकही आहेत.
13 / 15
सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या आकडेवारीत भारत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. याआधी दुसऱ्या स्थानी ब्राझील होता. मात्र भारताने आता ब्राझीलला देखील मागे टाकले आहे.
14 / 15
कोरोनाने प्रगत देशांना हतबल केले आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या ही महासत्ता अशी ओळख असणाऱ्या अमेरिकेत आहे. तसेच तेथील मृत्यूचे प्रमाण ही सर्वात जास्त आहे.
15 / 15
कोरोनाग्रस्तांची संख्या वाढ असतानाच अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात देखील केली आहे. जगभरात आतापर्यंत तब्बल 14,558,328 लोक बरे झाले आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAmericaअमेरिकाBrazilब्राझीलDeathमृत्यू