शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : दिलासादायक! देश कोरोनाची लढाई जिंकणार, 'हा' नवा फॉर्म्युला फायदेशीर ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 10:43 AM

1 / 15
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून कोरोना रुग्णांचा आकडा हा तब्बल 1,51,767 वर गेला आहे.
2 / 15
गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 6387 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 170 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबररदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत.
3 / 15
कोरोना व्हायरसविरोधात अद्याप प्रभावी असं औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही. मात्र इतर आजारांवरील औषधांचं ट्रायल कोरोनाविरोधात केलं जातं आहे.
4 / 15
कोविड-19 वर प्रतिबंधक लस बनविण्यासाठी जगात सुमारे 115 ठिकाणी संशोधन सुरू असून, त्यात भारतातील सात कंपन्या व विज्ञान संस्थांचा सहभाग आहे.
5 / 15
ज्या संशोधनासाठी कमाल पाच वर्षे लागू शकतात तेच संशोधन 18 ते 24 महिन्यांत पूर्ण करण्याचे व जगाची कोरोनाच्या साथीपासून कायमची मुक्तता करण्याचे ध्येय शास्त्रज्ञांनी बाळगले आहे.
6 / 15
कोरोनावर लस शोधण्याचं काम जगभरातीय सर्व देश करत असताना दुसरीकडे वेगवेगळ्या औषधांचाही वापर केला जात आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आता देश एक नवा फॉर्म्युला वापरत आहे.
7 / 15
प्रसिद्ध फार्मास्युटिकल कंपनी ग्लेनमार्क यांनी भारतीय नियामक मंडळाचे महासंचालक डीसीजीआय यांनी नवीन उपचार आणि औषधांसाठी आवश्यक मान्यता दिली आहे असा दावा केला आहे.
8 / 15
क्लिनिकल चाचणीसोबत पुढे जाण्यासाठी आता दोन 2 अँटी-व्हायरल औषधांचे मिश्रण भारतात वापरले जाणार आहे. फेविपिरवीर आणि उमिफेनोविर अशी या दोघांची नावं आहेत.
9 / 15
क्लिनिकल चाचणी ही देशभरातील रूग्णालयात दाखल झालेल्या कोव्हिड-19 रुग्णांवर केली जाईल आणि या उपचारादरम्यान सुरक्षा आणि प्रभाविपणा यांचे मूल्यांकन केले जाणार आहे.
10 / 15
भारतातील कोव्हिड रूग्ण दोन गटात विभागले जातील, ज्यामध्ये एका गटाला दोन अँटी-व्हायरल औषध तयार केलेल्या औषधाचे मिश्रण दिले जाईल, तर दुसर्‍या गटाला फक्त फेविपिरविर दिलं जाईल.
11 / 15
ग्लेनमार्क कंपनीने फेविपिरवीर आणि उमिफेनोविर वेगवेगळे काम करतात, म्हणून दोन अँटी-व्हायरल औषधांचे मिश्रण केल्यास त्याचे परिणाम चांगले येतील असा प्राथमिक अंदाज असल्याचं म्हटलं आहे.
12 / 15
क्लिनिकल ट्रायलला FAITH (FA vipiravir plus Um I fenovir Trial) असे नाव दिलं आहे.
13 / 15
फेविपिरविर हे एक ओरल अँटीवायरल औषध आहे. 2014 मध्ये जपानमध्ये उद्भभवलेल्या इन्फ्लूएन्झा व्हायरस संसर्गाच्या रुग्णांना हे औषध देण्यात आलं होतं. हे अँटी-व्हायरल औषध व्हायरल प्रतिकृती प्रतिबंधित करते.
14 / 15
उमिफेनोविर हे आणखी एक ओरल अँटीव्हायरल औषध आहे जी पेशींना व्हायरसच्या संपर्कात येण्यास प्रतिबंधित करते आणि व्हायरल एंट्री इनहिबिटर म्हणून कार्य करते.
15 / 15
फेविपिरविर आणि उमिफेनोविर या दोन्ही औषधांचं मिश्रण हे अँटीवायरल कव्हर करण्यासाठी सक्षम असल्याचं कंपनीने म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधंdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलIndiaभारतDeathमृत्यू