शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! दररोज 700 टन ऑक्सिजनचा पुरवठा करतेय Reliance; तब्बल 70 हजार रुग्णांचा वाचणार जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 8:33 AM

1 / 17
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल दीड कोटीवर गेली आहे. कोरोनाचा सुस्साट वेग सध्या पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
2 / 17
दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे.
3 / 17
देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,53,21,089 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,80,530 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 20,31,977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,53,21,089 पोहोचली.
4 / 17
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,80,530 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 20,31,977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान अनेक रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे.
5 / 17
रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे होणार? असा सवाल करत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी डॉक्टर प्रशासनाकडे करीत आहेत.
6 / 17
कोरोनाच्या संकटात रिलायन्सने मोठा दिलासा दिला आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना रिलायन्स राज्यांना दररोज तब्बल 700 टन ऑक्सिजनचा पुरवठा करत आहे. यामुळे 70 हजार रुग्णांचा जीव वाचणार आहे.
7 / 17
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडे (Reliance Industries) आपल्या जामनगर ऑईल रिफायनरीमध्ये दररोज 700 टनांहून अधिक मेडिकल-ग्रेड ऑक्सिजन (Medical Oxygen) तयार करत आहे. कोरोनाच्या संकटात काही राज्यांना हे ऑक्सिजन विनाशुल्क दिले जात आहे.
8 / 17
कोरोनामुळे देशात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा वापर लक्षात घेता रिलायन्सने अधिक ऑक्सिजन तयार करण्याचा निर्णय घेतला. गुजरातमधील कंपनीच्या जामनगर रिफायनरीने सुरुवातीला 100 टन वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनचे उत्पादन केले, जे आता त्वरित 700 टन करण्यात आले.
9 / 17
कोरोनाचा सामना करत असलेल्या गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यात पुरविल्या जाणाऱ्या पुरवठ्यामुळे दररोज 70,000 हून अधिक गंभीर रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच कंपनीची वैद्यकीय ग्रेड ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढवून 1000 टन करण्याची योजना आहे.
10 / 17
रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीमध्ये कच्चे तेल डिझेल, पेट्रोल आणि जेट इंधनासारख्या उत्पादनांची निर्मिती करते, जिथे मेडिकल-ग्रेड ऑक्सिजन तयार होत नाही. परंतु कोरोनो व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.
11 / 17
ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता रिलायन्सने वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनची निर्मिती करण्यास सक्षम असलेली यंत्रणा बसविली. मेडिकल ग्रेड ऑक्सिजन तयार करण्यासाठी औद्योगिक ऑक्सिजन तयार करण्याच्या सुविधांचा उपयोग केला जात आहे.
12 / 17
भारतातील राज्यांमध्ये दररोज सुमारे 700 टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. यामुळे दररोज 70,000 हून अधिक गंभीर आजार झालेल्या रुग्णांना दिलासा मिळेल. विशेष म्हणजे टँकरमध्ये मायनस 183 डिग्री सेल्सियसमध्ये ऑक्सिजन ठेवला जातो.
13 / 17
परिवहन खर्चासह राज्य सरकारांना विनाशुल्क ऑक्सिजन दिले जात आहे. हा कंपनीच्या सीएसआर उपक्रमाचा एक भाग असल्याचं म्हटलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे,
14 / 17
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus 2nd Wave) कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 12 दिवसांत पॉझिटिव्हिटी रेट दुप्पट झाला आहे. तर 10 राज्यांत 78 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत.
15 / 17
देशात कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. यावर तज्ज्ञांनी वेगवेगळी मतं दिली आहेत. पुढील तीन आठवडे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत असं म्हणत तज्ज्ञांनी मोलाचा सल्ला दिला आहे.
16 / 17
सेंटर फॉरसेल्युलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजीचे संचालक डॉक्टर राकेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढचे तीन आठवडे भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. यादरम्यान लोकांना कोरोनाचे नियम हे पाळावे लागतील.
17 / 17
ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉक्टर मिश्रा यांनी रुग्णालयामध्ये बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर आणि लसीची कमतरता कायम राहिल्यास देशात भयंकर स्थिती उद्भवेल. त्यामुळे पुढचे तीन आठवडे देशासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याRelianceरिलायन्सMukesh Ambaniमुकेश अंबानीIndiaभारत