CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! मोदी सरकार कोरोनाविरोधात अ‍ॅक्शन मोडमध्ये; केंद्राच्या 50 टीम महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाबला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 02:29 PM2021-04-06T14:29:52+5:302021-04-06T14:47:17+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

देशात कोरोनाचा वेग वाढला असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काही राज्यामंध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे.

कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 96,982 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनामुळे 446 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,26,86,049 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी याबाबत माहिती दिली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे विविध उपाय केले जात आहेत. तर कोरोनामुळे देशात दीड लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी मोठं पाउल उचललं आहे. केंद्राने उच्च स्तरीय 50 वैद्यकीय टीम तयार केल्या आहेत.

कोरोनाचां संसर्ग वेगाने होत असलेल्या भागांमध्ये या टीम पाठवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाबमधील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने 50 टीम तयार केल्या आहेत. या अतिशय उच्च स्तरीय टीम आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी टीम राज्यांना सहकार्य आणि मदत करतील. यामध्ये 30 टीम महाराष्ट्र, 11 टीम छत्तीसगड आणि 9 टीम या पंजाबमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असणार आहेत.

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयाला व्हेंटिलेटरचा पुरवठा होत असल्याची माहिती आता मिळत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच गुजरातमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले आहे.

देशात वेगाने लसीकरणाची मोहीम सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे, संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. पण तरीही कोरोनाचा ग्राफ वाढत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयाला व्हेंटिलेटरचा पुरवठा होत असल्याची माहिती आता मिळत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच गुजरातमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले आहे.

याच दरम्यान हा भयंकर प्रकार समोर आला आहे. सूरतमध्ये चक्क कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकमधून रुग्णालयात व्हेंटिलेटर नेण्यात आले आहेत. व्हेंटिलेटरचा तुटवडा असल्याने 34 व्हेंटिलेटर ट्रकमधून नेण्यात आले.

गुजरातमधील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ लक्षात घेऊन सरकारने रुग्णालयांमध्ये तुटवडा भासू लागल्याने गुजरात सरकारने वलसाड येथून सूरतला 34 व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्याचा आदेश दिला होता.

सरकारच्या आदेशानंतर सूरत महापालिकेने व्हेंटिलेटर आणण्यासाठी वलसाडला कचऱ्याची वाहतूक करणारा ट्रक पाठवला होता. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेण्यात येत आहे. मात्र तरी देखील कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे.

येत्या दोन आठवड्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग जगभरात थैमान घालणार असून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज अमेरिकन साथीचा रोग विशेषज्ञ मायकल ओस्टरहोम यांनी वर्तवला आहे.

ओस्टरहोम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महासाथीचा आजार पाचव्या श्रेणीतील चक्रीवादळासारखा आहे. येत्या काही दिवसात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. ही संख्या आतापर्यंतच्या रुग्णांपेत्रा अधिक असणार आहे.