शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : ...तर कोरोनाची तिसरी लाट रोखता येईल; नीती आयोगाच्या सदस्यांनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 8:26 PM

1 / 16
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली झाली आहे. रुग्णांचा आकडा 2,99,77,861 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 42,640 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,167 जणांचा मृत्यू झाला आहे.
2 / 16
कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,89,302 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. नव्या रुग्णांच्या संख्येतही घट होत आहे.
3 / 16
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. याच दरम्यान देशामध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.
4 / 16
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती ही सध्या व्यक्त केली जात आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी शर्थीचे सर्व प्रयत्न हे केले जात आहेत. याच दरम्यान देशात कोरोना लसीकरणही वेगाने सुरू आहे.
5 / 16
कोरोना लस आणि कोरोना नियमांचं पालन या दोन मार्गांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखता येईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. याच दरम्यान नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (Dr V K Paul) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
6 / 16
'जर आपण कोरोना नियमांचं नीट पालन केलं आणि कोरोना लस घेतली तर तिसरी लाट येईलच का? जास्तीत जास्त कोरोना लसीकरण आणि कोरोना नियमांचं योग्य पालन केल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखता येईल' असं पॉल यांनी म्हटलं आहे.
7 / 16
'असे अनेक देश आहेत, जिथं कोरोनाची दुसरी लाट आली नाही. जर आपण कोरोनासंबंधी नियमांचं नीट पालन केलं तर हा कालावधी निघून जाईल' असं देखील व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे.
8 / 16
देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू करण्यात आलं आहे. सोमवारी एका दिवसात तब्बल 69 लाख लोकांनी कोरोनाची लस घेतली असून आतापर्यंतचा हा आकडा सर्वाधिक असल्याची माहिती मिळत आहे.
9 / 16
देशात कोरोना लसीकरणाचा नवा रेकॉर्ड झाला आहे. देशातील आरोग्याविषय संशोधनासाठी आयसीएमआर ही एक प्रमुख संस्था आहे. 20 जूनपर्यंत देशात 28 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.
10 / 16
देशातील अधिकाधिक लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्यासाठी सरकार सर्वोतोपरीचे प्रयत्न करत आहे. याच दरम्यान लसीकरण मोहीम दुर्गम भागात सहज उपलब्ध करुन देण्याच्या योजनेवरही आता सरकार काम करत आहे.
11 / 16
सरकारकडून आता देशातील दुर्गम भागात, जिथे पोहचणं कठीण आहे, अशा ठिकाणी ड्रोनच्या (Drones) मदतीने कोरोना लस (Corona Vaccine) देण्याची योजना आखली जात आहे. आयआयटी कानपूरकडून करण्यात आलेल्या एका संशोधनात हे सांगण्यात आलं आहे.
12 / 16
सध्या देशात कोरोना लस खरेदी करण्याचं काम सरकारी कंपनी एचएचएल (HLL) लाइफकेअर (HLL Lifecare) करत आहे. याची सहाय्यक कंपनी एचएचएल इंफ्रा टेक सर्विसेज लिमिटेडने (HLL Infra Tech Services Limited) इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून (ICMR) देशातील दुर्गम भागात कोरोना लस पोहोचवण्यासाठी 11 जून रोजी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
13 / 16
तेलंगणामध्ये ड्रोनद्वारे कोरोना लस पोहोचवण्याच्या निर्णयावर काम करत आहे. देशातील दुर्गम भागात कोरोना लस पोहोचवण्यासाठी पाहण्यात येणाऱ्या या ड्रोनबाबत ICMR नेदेखील अभ्यास केला आहे.
14 / 16
आयआयटी कानपूरच्या सहकार्याने ICMR ने यासंदर्भात संशोधन केल्याचं सांगण्यात आलं आहे. यात त्यांनी कोरोना लस ड्रोनच्या माध्यमातून देशाच्या दुर्गम भागात पोहोचवता येऊ शकते का ते पाहण्यात आलं. ICMR ची ही चाचणी यशस्वी ठरली.
15 / 16
ICMR ने ड्रोनद्वारे कोरोना लसीच्या यशस्वी सप्लायसाठी एक स्टँडर्ड प्रोटोकॉल तयार केला आहे. त्याशिवाय आयसीएमआर दुर्गम भागात लस पोहोचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोनचं मॉडेल तयार करण्यावरही काम करत आहे.
16 / 16
ड्रोन चार किलोपर्यंतचं वजन घेऊन उडण्यास सक्षम असतील. लस, सेंटरपर्यंत पोहोचवून तेथून पुन्हा परतण्यासाठीही ड्रोन सक्षम असतील. ड्रोनचं टेक ऑफ आणि लँडिंग DGCA च्या गाइडलाइन्सवर आधारित असेल.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत