Coronavirus : कोरोनाबाधित मुलीचा मृतदेह नेण्यासाठी अॅम्बुलन्स मिळेना, अगतिक बापाने खांद्यावर घेऊन स्मशान गाठले

Published: May 15, 2021 10:09 PM2021-05-15T22:09:24+5:302021-05-15T22:11:41+5:30

Coronavirus: या मुलीचा मृतदेह नेण्यास अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन रुग्णालयात नेण्याची वेळ वडलांवर आली.

पंजाबमधील जलंधरमध्ये एक अगतिक बाप आपल्या ११ वर्षांच्या मुलीचा मृतदेह घेऊन रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून आले. ५०० पेक्षा अधिक रुग्णालये आणि १०० हून अधिक अॅम्ब्युलन्स असलेल्या या शहरात घडलेल्या या घटनेने व्यवस्थेला चपकार देण्याचे काम केले आहे. या मुलीचा मृतदेह नेण्यास अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन रुग्णालयात नेण्याची वेळ वडलांवर आली.

जालंधर येथील रामनगर येथे राहणारी ११ वर्षांच्या सोनू नावाच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या मुलीला कोरोना असल्याचे समोर आल्यावर तिला खांदा देण्यासाठी कुणीही समोर येईना.

अखेर वयस्कर वडलांनी तिचा मृतदेह खांद्यावर उचलून स्मशानापर्यंत घेऊन गेला. मानवतेला लाज आणणारा हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. कोरोनामुळे प्रशानसाने अंत्यसंस्काराचे नियम कडक केले आहे. कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. मात्र या पित्याला मुलीला खांद्यावर उचलून स्मशानात जाण्याची वेळ आली.

मृत मुलीच्या वडलांनी सांगितले की, मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर सीव्हिल रुग्णालयाने तिला अमृतसर येथे नेण्यास सांगितले. मात्र प्रशासनाकडून काहीही सुविधा मिळाली नाही.

दिलीप यांनी सांगितले की, जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा आजूबाजूच्यांनी स्पष्टपणे सांगितले की, कोरोनामुळे मृत्यू झाल्याने तिच्या मृतदेहाला आम्ही हात लावणार नाही. तिच्या अंत्यसंस्कारांची व्यवस्था वडलांनाच करावी लागेल. त्यामुळे वडलांवर स्वत:च अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!