शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

corona vaccine : म्हणून फायझर, मॉडर्नाऐवजी स्पुटनिक-V लसीला भारताने दिला परवानगी, ही आहेत कारणे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 9:12 AM

1 / 9
गेल्या काही दिवसांमध्ये देशातील कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या एक्स्पर्ट्स कमिटीने देशामध्ये रशियात विकसित झालेली कोरोनावरील लस स्पुटनिक-व्ही च्या आपातकालिन वापराची परवानगी दिली आहे. आता डीसीजीआय याबाबत अंतिम निर्णय घेईल. जर या लसीला परवानगी मिळाली तर भारतात उपलब्ध होणारी ही तिसरी अँटी कोविड लस ठरणार आहे.
2 / 9
सध्या भारतामध्ये स्पुटनिक-व्ही लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. यापूर्वी ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनेकाची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मान्यता मिळालेली आहे. मात्र जगभरात मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असलेल्या फायझर आणि मॉडर्नाच्या लसींच्या आधी स्पुटनिक-व्ही ला मान्यता का मिळाली, याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
3 / 9
स्पुटनिकची लस विकसित करणारी कंपनी गामलेया रिसर्च सेंटर फॉर एपिडेमियॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने दावा केला आहे की, स्पुटनिक-व्ही लस कोरोना विषाणू्च्या गंभीर प्रकारांमध्ये १०० टक्के प्रभावी आहे.
4 / 9
स्पुटनिक व्ही लसील आतापर्यंत १.२ अब्ज लोकसंख्या असलेल्या ५९ देशांमध्ये मान्यता मिळाली आहे. या लसीला ऑगस्ट २०२० मध्ये वापराची परवानगी मिळाली होती.
5 / 9
रशियाची ही लस सर्वसामान्य सर्दी, खोकला निर्माण करणाऱ्या adenovirus वर आधारित आहे. या लसीला आर्टिफिशल पद्धतीने तयार करण्यात आले आहे. ही लस कोरोना विषाणू SARS-CoV-2 मध्ये सापडणाऱ्या स्ट्रक्चरल प्रोटिनला कॉपी करते त्यामुळे शरीरामध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या इम्युन रिस्पॉन्सप्रमाणे इम्युन रिस्पॉन्स तयार होतो.
6 / 9
रशियात विकसित झालेल्या या लसीचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही एमआरएनए पद्धतीने तयार झालेली नाही. मात्र तरीही एमआरएनए पद्धतीच्या फायझर आणि मॉडर्नाच्या लसीप्रमाणेच प्रभावी आहे.
7 / 9
भारतामध्ये लसीच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळण्यासाठी त्याची काही लोकांवर चाचणी होणे गरजेचे आहे. देशामध्ये कुठलीही बाहेरील वस्तू येते तेव्हा आपल्या लोकांवर तिचा वापर करण्यापूर्वी एक ब्रिजिंगची ट्रायल होणे गरजेचे असते. रशियन कंपनीने या ट्रायलचा टप्पा पूर्ण केला आहे.
8 / 9
दुसरीकडे फायझरने भारतात लस पुरवण्यासाठी एकदा अर्ज केला होता. मात्र त्यांना येथे चाचणी घेण्यास सांगण्यात आले तेव्हा त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. तर मॉडर्नीने ट्रायलसाठी कधीच कुठलाही अर्ज केलेला नाही, या बाबतची माहिती आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी एका मुलाखतीमध्ये दिली होती.
9 / 9
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार सध्या फायझर आणि मॉडर्ना या कंपन्यांकडून भारतामध्ये त्यांच्या लसीच्या आपातकालीन वापरासाठी कुठल्याही प्रकारचा अर्ज देण्यात आलेला नाही.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारतrussiaरशियाHealthआरोग्य