शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चेन्नईमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, शाळा-कॉलेजला सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 8:49 PM

1 / 7
त्यामुळे राज्य सरकारने प्रशासनाला अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने राज्यभरात धोक्याचा इशारा देत पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
2 / 7
मागील 24 तासांत राज्यातील तटवर्ती भागात जोरदार पावसाची नोंद झाली.
3 / 7
बहुतांश शाळांना सुटी देण्यात आली असून रस्ते आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे.
4 / 7
ऑक्टोबर महिन्यात चेन्नईत झालेल्या पावसाने मागील 10 वर्षांचा विक्रम मोडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
5 / 7
पुढील काही दिवस व ६ ते ७ नाेव्हेंबरलाही चेन्नईसह जवळपासच्या भागात सरासरीहून अधिक पाऊस हाेण्याचा अंदाज अाहे.
6 / 7
तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळाचा प्रभाव सर्वसामान्याहून अधिक असणे, हे जास्त पाऊस होण्यामागील कारण असल्याचं बोललं जात आहे.
7 / 7
चेन्नईच्या इतिहासात पुराचा विचार करता 2015 मध्ये अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झाली होती.
टॅग्स :RainपाऊसChennaiचेन्नई