देशात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 01:24 AM2020-01-27T01:24:05+5:302020-01-27T01:30:45+5:30

देशात विविध राज्यांमध्ये ठिकठिकाणी ७१ वा प्रजासत्ताक दिन रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. दिल्लीतील राजपथावर लष्कर आणि पोलिसांचे पथसंचलन, चित्ररथ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी या सोहळ्यात रंगत आणली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत राष्ट्रपती भवनात करण्यात आलेली मनमोहक रोषणाई.

राजपथवरील प्रजासत्ताक दिन समारंभात अवकाशात शानदार कवायती करणाऱ्या सुखोई-३०एमकेआय या तीन लढाऊ विमानांनी उपस्थितांची मने जिंकली.

सीएए विरोधात आंदोलन करणा-या शाहीनबागमधील आंदोलकांनी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईच्या शिवाजी पार्कवर आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेला वनविभागाचा चित्ररथ.

श्रीनगरच्या शेर-ए- काश्मीर स्टेडियमवरील कार्यक्रमात सीआरपीएफच्या जवानांनी हाती तिरंगा घेत केलेले भांगडा नृत्य लक्षवेधी ठरले.

लडाखच्या बर्फाच्छादित खो-यात १७ हजार फूट उंचीवर देशाच्या संरक्षणासाठी तैनात जवानांनी हाती तिरंगा घेत गस्त घातली.

दिल्लीतील राजपथावर कॅप्टन तानिया शेरगीलने केले पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व.

राजस्थानमधील बिकानेर येथे शाळकरी मुलांनी साकारलेला तिरंगा.