Ayushman Card: आयुष्यमान योजनेचे फायदे, पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत काय आहे? एका क्लिकवर जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 02:37 PM2024-02-28T14:37:01+5:302024-02-28T14:40:49+5:30

आपल्याकडे केंद्र सरकार लोकांच्या फायद्याचे अनेक योजना लाँच करते. या योजनांद्वारे ग्रामीण भागासह शहरातील लोकांचा फायदा होतो.

कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ प्रामुख्याने गरीब वर्ग आणि गरजू लोकांना देण्याची तरतूद आहे. आयुष्मान भारत योजनाही तशीच एक योजना आहे.

या योजनेचा सर्वसामान्य लोकांना फायदा झाला आहे. ही योजना केंद्र सरकार चालवते आणि आता अनेक राज्य सरकारेही तिच्याशी संलग्न आहेत. ही आरोग्य योजना असून त्याद्वारे गरजू व गरीब वर्गाला लाभ देण्याचा प्रयत्न केला जातो.

आयुष्मान भारत योजना असे या योजनेचे पूर्ण नाव आहे. ही योजना विशेषत: असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी चालवली जात होती. केंद्र सरकार ही योजना राबवत आहे.

या योजनेसाठी पात्र असणाऱ्यांना आयुष्यमान कार्ड बनवले जाते, त्यानंतर कार्डधारक सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार घेऊ शकतात. त्याचा संपूर्ण खर्च सरकार उचलते.

योजनेसाठी हे आहेत पात्र- जे निराधार किंवा आदिवासी आहेत, जे लोक भूमिहीन आहेत,ज्या लोकांची घरे कच्ची आहेत. जे रोजंदारी मजूर आहेत ग्रामीण भागात राहणारे लोक. ज्यांच्या कुटुंबात दिव्यांग सदस्य इ.

असा करा अर्ज - आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी, अगोदर तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जावे लागेल. केंद्रात तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याला भेटून तुमची कागदपत्रे द्यावी लागतील ज्यांची पडताळणी केली जाते.

यानंतर तुमची पात्रता तपासली जाते . मग जेव्हा सर्वकाही बरोबर आढळले, तरच तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.