Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:30 IST2025-06-25T12:25:38+5:302025-06-25T12:30:16+5:30

आज भारतासाठी खूप ऐतिहासिक क्षण आहे. भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला जागतिक अंतराळ स्टेशन(ISS) साठी रवाना झाले आहेत. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एखादा भारतीय वैज्ञानिक ISS सारख्या हायटेक स्पेस मिशनचा हिस्सा आहे.
शुभांशू शुक्ला यांना या मिशनसाठी ना प्रतितास सॅलरी दिली जाईल ना अन्य कुठलाही मोबादला दिला जाणार नाही. या संपूर्ण मोहिमेचा खर्च भारत सरकार स्वतः उचलत आहे. माहितीनुसार, भारताने या मोहिमेसाठी अमेरिकेच्या खाजगी अंतराळ कंपनी अॅक्सियम( Axiom) स्पेसला सुमारे ५४८ कोटी रुपये दिले आहेत. ही रक्कम शुभांशूच्या प्रशिक्षण, प्रवास, अंतराळ सूट, संशोधन किट आणि इतर आवश्यक संसाधनांवर खर्च केली जात आहे.
शुभांशूचे हे अभियान सुमारे १४ दिवसांचे असेल, ज्यामध्ये ते अंतराळात राहून सुमारे ६० वैज्ञानिक प्रयोगांमध्ये सहभागी होतील. या प्रयोगांमध्ये मानवी शरीरावर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा परिणाम, अंतराळातील अन्न चाचणी, जैव संशोधन आणि भविष्यासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचा तपास यांचा समावेश आहे.
शुभांशू शुक्ला हे मूळचे उत्तर प्रदेशातील लखनौ येथील आहेत. त्यांनी एनडीएमधून शिक्षण घेतले आहे आणि बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एम.टेक केले आहे.
ते २००६ मध्ये भारतीय हवाई दलात पायलट बनले आणि आतापर्यंत २००० तासांहून अधिक काळ लढाऊ विमाने उडवण्याचा त्यांना अनुभव आहे. २०१९ मध्ये त्यांची भारताच्या गगनयान मोहिमेसाठी निवड झाली आणि या अंतर्गत त्यांनी रशिया आणि भारतात कठोर प्रशिक्षण घेतले.
शुभांशू शुक्ला यांना Su-30 MKI, MiG 21, MiG 29, Jaguar, Hawk सारखी विमाने उडवण्याचा अनुभव आहे. याशिवाय, शुभांशू हे राकेश शर्मा नंतर अंतराळात जाणारा दुसरा भारतीय असेल आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारा पहिला भारतीय असेल.
हे मिशन भारत आणि नासा यांच्या संयुक्त मदतीने होत आहे. भारताने या मिशनसाठी खर्च केला आहे. या मोहिमेत शुभांशूला भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी महत्त्वाचा अनुभव मिळेल जो भविष्यातील मानवी अंतराळ उड्डाण मोहिमांमध्ये भारताला मदत करेल.
शुभांशू शुक्ला यांना अंतराळात राहण्यासाठी कोणताही पगार किंवा मोबदला दिला जाणार नाही. ते या मोहिमेत भारताचे प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. अंतराळ मोहिमेसाठी त्यांच्यासोबत आणखी ३ लोक जाणार आहेत.
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी ३ एप्रिल १९८४ साली स्पेस मिशन सोवियत संघाच्या मदतीने केले होते. त्यानंतर शुभांशू शुक्ला हे दुसरे भारतीय अंतराळात जात आहे. १ वर्षाच्या कठोर मेहनतीनंतर स्पेस मिशनसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
याआधी हे मिशन सात वेळा टळले आहे. बऱ्याचदा समोर आलेल्या तांत्रिक बिघाडानंतर अखेर ISS चे ज्वेज्दा मॉड्यूल उड्डाणासाठी तयार करण्यात आले. अनेक वर्ष अंतराळ संस्था यावर काम करत होती. नासाच्या कॅनडी स्पेस सेंटरवरून फाल्कन ९ ने यशस्वी अवकाशाकडे उड्डाण घेतले आहे.