अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:36 IST2025-06-25T13:31:53+5:302025-06-25T13:36:14+5:30

Shubanshu Shukla: भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी ऑक्सीओम-४ मोहिमेंतर्गत इतर ३ अंतराळवीरांसह अंतराळात झेप घेतली आहे. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस स्टेशन इथून शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर तीन अंतराळवीरांना घेऊन फाल्कन ९ रॉकेट आणि ड्रॅगन अंतराळ यान अंतराळ स्थानकाकडे रवाना झालं आहे. दरम्यान, राकेश शर्मा यांच्यानंतरचे दुसरे भारतीय अंतराळवीर असलेल्या शुभांशू शुक्ला यांच्याबाबत जाणून घेण्यास लोक खूप उत्सूक आहेत.

भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी ऑक्सीओम-४ मोहिमेंतर्गत इतर ३ अंतराळवीरांसह अंतराळात झेप घेतली आहे. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस स्टेशन इथून शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर तीन अंतराळवीरांना घेऊन फाल्कन ९ रॉकेट आणि ड्रॅगन अंतराळ यान अंतराळ स्थानकाकडे रवाना झालं आहे. दरम्यान, राकेश शर्मा यांच्यानंतरचे दुसरे भारतीय अंतराळवीर असलेल्या शुभांशू शुक्ला यांच्याबाबत जाणून घेण्यास लोक खूप उत्सूक आहेत.

लखनौमधील प्रतिष्ठित सिटी माँटेसरी स्कूलमधून सुरुवातीचं शिक्षण घेणाऱ्या शुभांशू शुक्ला यांची १२वीचं शिक्षण पूर्ण करण्यापूर्वीच नॅशनल डिफेन्स अकादमी (एनडीए)मध्ये निवड झाली होती. पुढे २००६ मध्ये ते भारतीय हवाई दलात पायलट बनले. त्यानंतर तीन वर्षांतच ते विंग कमांडर आणि नंतर कॅप्टन बनले. त्यांच्याकडे २ हजार तासांहून अधिकचा विमान उड्डाणाचा अनुभव आहे. दरम्यान, भारताच्या सैन्यदलात सेवा देणाऱ्या शुभांशू शुकला यांची लव्हस्टोरीही फार रंजक आहे.

शुभांशू शुक्ला यांची पत्नी डॉ. कामना मिश्रा ह्या पेशाने डेंटिस्ट आहेत. शाळेमध्ये असल्यापासून ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. तसेच ओळख वाढल्यानंतर कुटुंबीयांच्या परवानगीने ते विवाहबंधनात अडकले. त्यांना एक मुलगा आहे.

शुभांशू शुक्ला हे खूप लाजाळू, शांत स्वभावाचे व्यक्ती आहेत. तसेच ते खूप विनम्र आणि मृदुभाषी आहेत, असे त्यांच्या पत्नी कामना मिश्रा सांगतात.

शुभांशू शुक्ला यांच्या पत्नी डॉ. कामना मिश्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, शुभांशू यांचं पहिलं प्रेम नेहंमी आकाशच राहिलं आहे. दरम्यान, अंतराळात जाण्याची शुभांशू शुक्ला यांची मोहीम ही २०२० मध्येच सिुरू झाली होती. इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी जेव्हा प्रशिक्षित अंतराळवीराचा शोध सुरू झाला तेव्हा शुभांशू हे पुढे आले होते. दीड वर्षांची कठोर मेहनत आणि प्रशिक्षणानंतर त्यांची निवड झाली होती.

दरम्यान, आता या १४ दिवसांच्या अंतराळ मोहिमेनंतर शुभांशू शुक्ला हे इस्रोच्या स्वदेशी अंतराळ मोहिमेसोबत जाणाऱ्या अंतराळवीरांच्या समुहाचाही भाग बनणार आहेत.