अनुष्का शर्मा कुटुंबासह इटलीला रवाना!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 01:39 PM2017-12-08T13:39:52+5:302017-12-08T13:41:47+5:30

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

विराट-अनुष्काच्या लग्नाची जोरदार चर्चा असताना गुरूवारी रात्री उशिरा अनुष्का शर्मा कुटुंबीयांसोबत मुंबई विमानतळावर दिसली.

अनुष्का शर्मा तिच्या आई, बाबा आणि भावासोबत गुरूवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर दिसली.

अनुष्का तिची आई आशिमा शर्मा आणि वडील अजय कुमार शर्मा यांच्यासोबत दिसली. त्यावेळी मोठा भाऊ कर्णेश शर्माही त्यांच्यासोबत होता.