'Air India Plane Crash': ‘टेबलटॉप’ रनवे म्हणजे काय? का असते येथील लँडिंग धोकादायक; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 08:18 AM2020-08-08T08:18:46+5:302020-08-08T08:28:15+5:30

Air India Plane Crash in Kerla, Latest News : कोझिकोडे विमानतळावर एअर इंडिया एक्स्प्रेस एएक्सबी १३४४, बोईंग ७३७ या दुबईहुन कालिकत येथे जाणाऱ्या विमानाला काल रात्री झालेल्या अपघातात वैमानिकांसह काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

केरळमधील कोझिकोडे विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात वैमानिकांसह काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या अपघातानंतर ‘टेबलटॉप’ रनवे हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तर टेबलटॉप रनवे म्हणजे काय आणि त्यावर विमान उतरवणं हे अधिक धोकादायक का असतं, हे जाणून घेऊया...

कोझिकोडे विमानतळावर एअर इंडिया एक्स्प्रेस एएक्सबी १३४४, बोईंग ७३७ या दुबईहुन कालिकत येथे जाणाऱ्या विमानाला काल रात्री झालेल्या अपघातासाठी विमानतळावरील टेबलटॉप रनवे हा कारणीभूत ठरण्याचे सांगण्यात येत आहे.

 टेबलटॉप रनवे म्हणजे काय? - Marathi News | टेबलटॉप रनवे म्हणजे काय? | Latest national Photos at Lokmat.com

विमानतळ हे सर्वसाधारणपणे मैदानी, सपाट भागावर बनवले जातात. मात्र डोंगराळ प्रदेशात अशी सपाट जागा फार उपलब्ध नसल्याने डोंगरमाथ्यावरील सपाट भागावर विमानतळाची धावपट्टी तयार केली जाते. अशा ठिकाणी धावपट्टीच्या आजूबाजूच्या भागात डोंगरउतार असतो. त्यामुळे ‘टेबलटॉप’ धावपट्टी संपल्यानंतर पुढे फारशी जागा नसते.

कोझिकोडे येथील विमानतळही भौगोलिकदृष्ट्या टेबलटॉप आहे. त्यामुळेच येथील धावपट्टीवरून विमान घसरल्यानंतर पुढील डोंगरऊतारावरून खाली पडले आणि त्याचे दोन तुकडे झाले.

 म्हणून टेबललटॉप रनवेवर विमान उतरवणे असते धोकादायक - Marathi News | म्हणून टेबललटॉप रनवेवर विमान उतरवणे असते धोकादायक | Latest national Photos at Lokmat.com

टेबलटॉप धावपट्टीच्या एका किंवा दोन्ही बाजूने डोंगर उतार असल्याने अशा ठिकाणी विमान उतरवणे हे जोखमीचे काम असते. अशा ठिकाणी विमान उतरवताना किंवा उड्डाण करताना खूप खबरदारी घ्यावी लागते. त्यामुळे अशावेळी वैमानिकाला खूप काळजीपूर्वक काम करावे लागते.

बहुतांश टेबलटॉप धावपट्ट्या ह्या पठार किंवा डोंगरमाथ्यावर असतात. भारतामध्ये कर्नाटकातील मंगळुरू, केरळमधील कोझिकोड आणि मिझोराम येथे अशा टेबलटॉप धावपट्ट्या आहेत.

यापूर्वीही टेबलटॉप धावपट्टीवर झाला होता अपघात - Marathi News | यापूर्वीही टेबलटॉप धावपट्टीवर झाला होता अपघात | Latest national Photos at Lokmat.com

भारतात यापूर्वीही टेबलटॉप धावपट्टीवर भयावह अपघात झाले आहेत. २२ मे २०१० रोजी मंगळुरूमधील विमानतळावर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला झालेल्या अपघाताता १५८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी धावपट्टीवर उतरत असताना हे विमान पुढे जाऊन दरीत पडले होते. तसेच त्यानंतर या विमानाचा स्फोट झाला होता.