Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:49 IST2025-07-15T12:57:56+5:302025-07-15T13:49:00+5:30

Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताबाबत AAIB चा प्राथमिक तपास अहवाल समोर आल्यानंतर आता ब्रिटिश एजन्सीने मोठा दावा केला आहे.

Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातानंतर, एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) चा प्राथमिक अहवाल समोर आल्यानंतर एक मोठा दावा करण्यात आला आहे. अपघाताच्या चार आठवड्यांपूर्वी, ब्रिटनच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने (CAA) बोईंग विमानांमधील इंधन नियंत्रण स्विचमधील समस्येबद्दल तक्रार केली होती.

यामध्ये त्यांनी CAA ने दररोज पाच प्रमुख बोईंग विमानांचे इंधन नियंत्रण स्विच तपासण्यास सांगितले होते. पण, एअर इंडियाने याकडेही दुर्लक्ष केले. अपघाताची चौकशी करणाऱ्या भारतीय एजन्सीने त्यांच्या प्राथमिक अहवालात ही वस्तुस्थिती नमूद केलेली नाही.

यूके सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी (CAA) ने १५ मे २०२५ रोजी एक सुरक्षा सूचना जारी केली. त्यात म्हटले आहे की, बोईंग मॉडेल्स चालवणाऱ्या विमान कंपन्यांना यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) च्या एअरवॉर्थिनेस निर्देशांचे पालन करण्याचा सल्ला दिला.

FAA ने त्यांच्या एअरवॉर्थिनेस निर्देशात बोईंग विमानांवरील इंधन नियंत्रण स्विचबद्दल चिंता व्यक्त केली असती.

सीएएने नोटीसमध्ये म्हटले होते की, अमेरिकन एजन्सीने जारी केलेल्या एअरवॉर्थिनेस निर्देशानुसार, पाच प्रमुख बोईंग विमान मॉडेल्स B737, B757, B767, B777, B787 चे इंधन नियंत्रण स्विच खराब होण्याची शक्यता आहे आणि ते दररोज तपासणे आवश्यक आहे. अहमदाबादमध्ये अपघातग्रस्त झालेले विमान बोईंग 787-8 होते.

ब्रिटीश एजन्सीने त्यांच्या नोटीसमध्ये असेही म्हटले आहे की, एअरलाइन ऑपरेटर्सनी बोईंग ७८७ विमानांवरील इंधन नियंत्रण स्विच आणि इंधन शटऑफ व्हॉल्व्ह अ‍ॅक्च्युएटर्सची चाचणी, तपासणी आणि बदल करावी.

'एअरवर्थिनेस डायरेक्टिव्हमुळे प्रभावित झालेल्या विमानांवरील इंधन नियंत्रण स्विचची दररोज तपासणी केली पाहिजे,असं नोटीसमध्ये नमूद केले आहे.

AAIB ने प्राथमिक अहवालात म्हटले आहे की, अमेरिकन एजन्सी फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) ने १७ डिसेंबर २०१८ रोजी स्पेशल एअरवर्थिनेस इन्फॉर्मेशन बुलेटिन (SAIB) क्रमांक NM-18-33 जारी केला होता. त्यात म्हटले आहे की, विमानाच्या इंधन नियंत्रण स्विचचे लॉकिंग फिचर निष्क्रिय असण्याची शक्यता आहे. बोईंग 737 मॉडेल विमानाच्या काही ऑपरेटर्सकडून मिळालेल्या अहवालांच्या आधारे FAA ने हा सल्ला जारी केला होता.

ऑपरेटर्सनी अहवालात म्हटले होते की, या मॉडेलच्या काही विमानांमध्ये इंधन नियंत्रण स्विचचे लॉकिंग फिचर निष्क्रिय होते.

अहवालात म्हटले आहे की,अहमदाबादमध्ये क्रॅश झालेल्या विमानातही असाच इंधन नियंत्रण स्विच बसवण्यात आला होता. एफएएच्या सल्ल्यानंतरही एअर इंडियाने इंधन नियंत्रण स्विचच्या लॉकिंग फिचरची तपासणी केली नाही, असे तपासात समोर आले. याबद्दल एअर इंडियाने म्हटले होते की एफएएने फक्त सल्ला जारी केला असल्याने, तो अनिवार्य सूचना नव्हता. त्यामुळे, इंधन नियंत्रण स्विच तपासण्यात आला नाही.