प्रवास सुखकर होणार, पुन्हा एकदा 'फेअरी क्वीन' धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 10:21 AM2019-11-12T10:21:50+5:302019-11-12T10:39:07+5:30

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या सर्वात जुन्या वाफेच्या इंजिनवर चालणारी फेअरी क्वीन पुन्हा एकदा धावणार आहे.

उत्तर रेल्वे प्रशासनाने येत्या 14 डिसेंबरला चालवण्याची शक्यता व्यक्त केली आहे. इंजिनमध्ये बिघाड आणि तांत्रिक अडचणीमुळे ही रेल्वे एक वर्षांपासून बंद आहे.

दिल्ली कॅट ते रेवाडी स्थानकापर्यंतही फेअरी क्वीन चालवण्यात येते. प्रवास करणाऱ्या नागरिकांना पुन्हा एकदा वाफेच्या इंजिनाचा आनंद घेता येणार आहे.

आयआरसीटीच्या संकेतस्थळावर याचे बुकिंग सुरू केले जाईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

फेअरी क्वीनमधून एकाचवेळी 100 प्रवासी प्रवास करू शकतात. यात दोन कोचची सुविधा आहे.

सकाळी साडेदहा वाजता दिल्ली कॅट येथून फेअरी क्वीन रवाना होईल आणि दुपारी दीड वाजता रेवाडी येथे पोहचेल.

पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन 1 नोव्हेंबर 1977 पासून पुन्हा एकदा चालवण्यास सुरुवात करून 2018 पर्यंत फेअरी क्वीन रेल्वे चालवण्यात आली.