येवल्यात पाणीटंचाईचे भीषण वास्तव सांगणारी ही छायाचित्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 20:18 IST2018-05-09T20:18:39+5:302018-05-09T20:18:39+5:30

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील ममदापूर, राजापूर, खरवंडी आदि भागातील पुर्व परिसरात सध्या पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सजीवसृष्टीचा सुरू आहे.
पिण्याच्या पाण्याच्या शोधात मुक्या जनावरांची सुरू असलेली ही भटकंती
ममदापूर-राजापूर काळवीट संवर्धन संरक्षित अभयारण्यात कृत्रिम पाणवटे उभारून काळवीटांची तहान भागविण्याचा प्रयत्न वनविभागाकडून केला जात आहे.
ममदापूर भागात पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे रहिवाशांना घरे सोडणे भाग पडले आहे. (सर्व छायाचित्रे : प्रशांत खरोटे)