Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 10:52 IST
1 / 7Nanded Crime News : नांदेड जिल्ह्यातील सक्षम ताटे या तरुणाची काही दिवसापूर्वी हत्या झाली. २१ वर्षीय आंचल ममदीवारने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केले होते. यामुळे हे प्रकरण देशात चर्चेत आले आहे. दरम्यान, आता या प्रकरणी दररोज नवीन माहिती समोर येत आहेत. आता सक्षमच्या आईने धक्कादायक माहिती दिली आहे. 2 / 7सक्षम ताटे याचे आचल मामीडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, या प्रेमसंबंधांना आचलच्या कुटुंबीयांचा विरोध होता. या प्रकरणातील आरोपी तरुणीचे वडील आणि दोन भाऊ आहेत. काही महिन्यांपूर्वी सक्षमच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आंचलने केला आहे.3 / 7सक्षम ताटे याच्या आईने आचलचे वडील गजानन मामीडवार आणि भावांवर गंभीर आरोप केले आहेत. आचलच्या भावांनी काही दिवसापूर्वी सक्षमच्या वाढदिवसा निमित्त सक्षमला फक्त काटे असलेले गुलाबाचे झाड भेट म्हणून दिले होते. त्यावेळी त्यांनी सक्षमला संकेत दिले होते.4 / 7काही दिवसापूर्वीच सक्षम याचा वाढदिवस झाला. हा वाढदिवस त्याच्या मित्रांनी जल्लोषात साजरा केला. यावेळी आंचलच्या भावांनी त्याला एक गुलाबाचे झाड भेट दिले. या गुलाबाच्या झाडाला फक्त काटेच होते. हे झाड जोपर्यंत हिरवं राहील तोपर्यंत आपलं प्रेम राहील, असे आचलचे कुटुंबीय तेव्हा सक्षमला म्हणाले होते.5 / 7'आचलचे भाऊ आपण सक्षमचे जिगरी मित्र असल्याचे दाखवायचे. त्यांनी वाढदिवसाला सक्षमला काटेरी झाड दिले त्यावेळी आम्हाला त्याचा अर्थ कळला नव्हता. 6 / 7मात्र त्यावेळी आंचलच्या भावांनी आंचलला सांगितले होते की, आम्हाला याचा काटा काढायचा आहे, म्हणून आम्ही सक्षमला काटेरी झाड दिले. पुढे त्यांनी खरंच माझ्या मुलाला मारले. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असी मागणी सक्षमच्या आईने केली.7 / 7माझा मुलगा गुन्हेगार नव्हता. . मामीडवार कुटुंबीयांनी त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते, असंही आईने सांगितले. आचलच्या भावांनी आमच्यासमोर सक्षमला चहा प्यायला बोलावून नेले. तो जात नव्हता तरी त्याला जबरदस्ती नेले. सक्षम हा गुन्हेगारही नव्हता. आचलचे वडील गजानन मामीडवार यांनी त्याला फसवले, असा आरोपही त्यांनी केला.