लोकमत महामॅरेथॉनमध्ये पहाटेच्या प्रसन्न हवेत अबालवृद्धांसह सहर्ष धावले नागपूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2022 18:07 IST2022-03-27T11:39:32+5:302022-03-27T18:07:17+5:30

नागपूर : ‘लोकमत’ समूहातर्फे आयोजित व मुख्य प्रायोजक ‘प्लास्टो टँक ॲण्ड पाईप’ आणि पॉवर्ड बाय ‘ग्लोकल स्क्वेअर’ प्रस्तुत विदर्भातील सर्वांत मोठ्या नागपूर महामॅरेथॉनला रविवारी पहाटे साडेपाचच्या ठोक्याला अत्यंत हर्षोल्हासात सुरुवात झाली. यावेळी धावण्यासाठी उत्सुक असलेले नागपुरातील हजारो नागरिक पहाटेच कस्तुरचंद पार्कवर जमा झाले होते.