Bigg boss marathi 3 : दादूसच्या पत्नीचे 'हे' लय भारी Photos पाहिलेत का? सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रीपेक्षा नाही कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 03:55 PM2021-09-30T15:55:46+5:302021-09-30T16:01:41+5:30

Bigg boss marathi 3: कोळी गीतांचा बादशाह अशी ओळख असलेल्या दादूसने पहिल्यांदाच एका रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे.

छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व सुरु झालं आहे. या पर्वामध्ये प्रत्येक जण टिकून राहण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. त्यातच संतोष चौधरी अर्थात दादूस प्रेक्षकांची मन जिंकण्यास यशस्वी ठरत आहेत.

कोळी गीतांचा बादशाह अशी ओळख असलेल्या दादूसने पहिल्यांदाच एका रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे. मात्र, त्यांच्यातील साधेपणामुळे ते प्रेक्षकांची मन जिंकत आहेत.

अलिकडेच झालेल्या एका टास्कमध्ये दादूसने त्यांची खिलाडीवृत्ती दाखवली होती. ब्लडप्रेशर आणि डायबेटीस असतानाही त्यांनी भरपूर मीठ घातलेला पदार्थ खाऊन दाखवला होता. त्यामुळे दादूस सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या दादूससोबत त्यांचे कुटुंबीयदेखील चर्चेत येत आहेत. यामध्येच दादूसच्या पत्नीविषयी जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे.

दादूस यांच्या पत्नीचं नाव योगिता चौधरी असं आहे.

योगिता चौधरी सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असून अनेकदा त्या त्यांचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असतात.

पाश्चात्य कपड्यांमध्ये अनेकदा दिसणाऱ्या योगिता साडीमध्येदेखील तितक्याच छान दिसतात.

पत्नी आणि मुलीच्या सांगण्यावरुनच दादूस यांनी बिग बॉसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

योगिता यांनी काश्मीरमध्ये काढलेला एक सुंदर फोटो

योगिता अनेकदा इन्स्टाग्रामवर सण, उत्सवाच्या काळातले फोटो शेअर करत असतात.