'मार्जिन मनी' योजनेतून मिळेल एक कोटीचे कर्ज ! उद्योगासाठी असा घेऊ शकता लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 18:30 IST2026-04-11T18:17:06+5:302026-04-11T18:30:43+5:30
केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी 'स्टैंड अप इंडिया 'अंतर्गत मार्जिन मनी योजना राबवण्यात येते. या योजनेत केवळ १० टक्के भांडवल स्वतःकडे असल्यास एक कोटीपर्यंतचे कर्ज मिळण्याची सोय आहे.

You will get a loan of one crore from the 'Margin Money' scheme! You can take this benefit for your industry

कोणत्या उद्योगांसाठी मिळते कर्ज ? : योजनेअंतर्गत उत्पादन, सेवा किंवा व्यापार या क्षेत्रातील नवीन प्रकल्प उभारण्यासाठी कर्ज दिले जाते. यामध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित प्रक्रिया उद्योगांचाही या मध्ये समावेश असल्याचे सांगण्यात आले.

काय आहे मार्जिन मनी योजना ? : स्टैंड अप इंडिया योजनेंतर्गत १० टक्के स्वहिस्सा पात्र लाभार्थ्याने भरणा केल्यानंतर व बँकेने स्टैंड अप योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यावर उर्वरित १५ टक्के राज्य शासनाकडून दिले जातात.

योजनेसाठी पात्रता काय ? : अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजाचा असावा. अर्जदार हा नवीन उद्योजक असावा. बँकेचे थकबाकीदार नसावेत. कर्ज मर्यादा १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत आहे.

कुठे, कसा करायचा अर्ज ? : अर्जदाराने www.standupmitra.in या पोर्टलवर नोंदणी करावी. बँकेची तत्त्वतः मंजुरी मिळाल्यानंतर राज्य शासनाच्या १५ टक्के मार्जिन मनीसाठी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयात अर्ज करावा.

















