शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

भक्तीचा बाजार मांडणारा अन् स्वतःला 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा कोण आहे हा मनोहर भोसले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 13:49 IST

1 / 9
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुण्याच्या मांजरी परिसरातून मनोहर मामाला नाट्यमयरीत्या बेड्या ठोकल्या असून, या अटकेमुळे कथित महाराजांच्या आडोशाने सुरू असलेल्या काळ्या धंद्यांचा पर्दाफाश झाला आहे.
2 / 9
मनोहर भोसले हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील इंदापूरातल्या लारसुणे गावातला रहिवासी. 'माझ्या अंगात दैवी शक्ती आहे आणि मी संत बाळूमामाचा अवतार आहे,' असा प्रचार करून त्याने अल्पावधीतच आपले प्रस्थ निर्माण केले होते.
3 / 9
मनोहरने डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता. मनोहर एक दिवस अचानक गायब झाला. काही वर्षानंतर पुन्हा याच गावात आल्यानंतर आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न असून त्यांचा आशीर्वाद असल्याचे सांगितले.
4 / 9
साक्षात बाळूमामा येत असल्याचे ऐकल्यानंतर अमावस्या पौर्णिमेला त्याच्याकडे भक्ताची मोठी गर्दी होऊ लागली. गावच्या झोपडीत राहणार मनोहर मामा म्हणून प्रसिद्ध झाला. भक्तांच्या पैशावर मठ बांधले. करमाळा आणि गाणगापूर येथे मनोहर मामा भोसले याचे मठ आहेत.
5 / 9
राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि बड्या अधिकाऱ्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून त्याने स्वतःचे एक ग्लॅमर तयार केले होते.
6 / 9
कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात मनोहर भोसले विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पीडित व्यक्तीला 'पूजा-अर्चा करून तुमची आर्थिक परिस्थिती सुधारतो,' असे आमिष दाखवून भोसलेने त्यांची फसवणूक केली आणि छळ केला.
7 / 9
या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत त्याला पुण्यातून उचलले. त्याच्यावर फसवणूक आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कठोर कलमे लावण्यात आली आहेत.
8 / 9
मनोहर भोसलेचा इतिहास गुन्हेगारी प्रवृत्तीचा राहिला आहे. २०२१ मध्ये त्याच्यावर सोलापूर आणि पुणे ग्रामीण भागात मिळून एकूण ४ गंभीर गुन्हे दाखल झाले होते. आश्रमात येणाऱ्या महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत.
9 / 9
केवळ एकाच गुन्ह्याचा तपास करून पोलीस थांबणार नाहीत. 'आम्ही या सर्व गुन्ह्यांच्या मुळाशी जाणार आहोत. पीडितेच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेऊन ज्या प्रकारे फसवणूक झाली, त्यामागचे मोठे रॅकेट उघड करण्याची शक्यता आहे,' असे पोलिसांनी सांगितले.
टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस