By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 20:02 IST
1 / 5गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची वणवण - आखाती देशांतील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. ग्रामीण भागात वेळेवर सिलिंडर न मिळाल्याने गृहिणींना पुन्हा चुलीकडे वळावे लागत आहे. अशा परिस्थितीत बायोगॅस हा शाश्वत इंधन पर्याय म्हणून समोर आला आहे.2 / 5राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम - केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागात स्वच्छ इंधन आणि खत उपलब्ध करून दिले जाते. या योजनेमुळे महिलांचे थुरापासून संरक्षण होते, स्वयंपाकाचा वेळ वाचतो.3 / 5स्लरीचा सेंद्रिय खत म्हणून होतो वापर - गॅसनिर्मितीनंतर बाहेर पडणाऱ्या शेणकाल्याला (स्लरी) उत्कृष्ट दर्जाचे सेंद्रिय खत मानले जाते.4 / 5असे मिळते अनुदान - संयंत्राच्या क्षमतेनुसार लाभार्थ्यांना १४ हजार ३५० ते २९ हजार २५० रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य थेट बँक खात्यात मिळते. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी अनुदानाची रक्कम अधिक असते. शौचालय जोडणी केल्यास मिळणारे अतिरिक्त १ हजार ६०० रुपये हे स्वच्छतेसाठी प्रोत्साहन म्हणून दिले.5 / 5कुठे, कसा करायचा अर्ज ? - ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीच्या कृषी विभागात संपर्क साधावा. विहित नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह तो विस्तार अधिकारी (कृषी) यांच्याकडे जमा करावा लागतो. अर्जाची छाननी झाल्यानंतर तांत्रिक मंजुरी पाठविला जातो.