मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्यभर शिक्षकांचा एल्गार By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2017 7:39 PM
1 / 7 महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी पाच टप्प्यात आंदोलन पुकारले आहे. 2 / 7 त्यातील पहिल्या टप्प्यात आज राज्यातील सर्व तहसील कार्यालयांवर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. 3 / 7 महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून आज सर्व आमदारांना निवेदने देण्यात येत आहेत. 4 / 7 आंदोलनाचा हा पहिला टप्पा असून अखेरच्या टप्प्यात बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. 5 / 7 महासंघाचे अध्यक्ष प्रा.अनिल देशमुख यांनी हा इशारा दिला दिला आहे. 6 / 7 मुक्ताईनगर,जिल्हा जळगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देतांना. 7 / 7 नंदुरबार येथील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देताना. आणखी वाचा