By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 18:59 IST
1 / 7महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या 'राष्ट्रवादी एकीकरण' चर्चेचा सर्वात मोठा फॉर्म्युला आता समोर आला आहे. शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार होते, असा दावा केला जात आहे. मात्र, दिल्लीतील मंत्रीपदाच्या एका अटीमुळे हा संपूर्ण रोडमॅप थांबल्याचे समोर येत आहे. 2 / 7दोन्ही गटांमध्ये झालेल्या गुप्त चर्चेनुसार सत्तेचे वाटप खालीलप्रमाणे ठरणार होते. शरद पवार सक्रिय राजकारणातून संन्यास घेतील आणि पक्षाचे मार्गदर्शक/सल्लागार म्हणून काम पाहतील. 3 / 7पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद आणि निर्णय घेण्याचे सर्व अधिकार अजित पवारांना सोपवले जातील. तसेच राज्याचे नेतृत्व शरद पवार गटाच्या नेत्यांकडे (जयंत पाटील) राहील, असा प्रस्ताव होता.4 / 7आजतकने दिलेल्या वृत्तानुसार या एकत्रीकरणासाठी शरद पवार गटाने सत्तेत सहभागी होण्यासाठी काही अटी ठेवल्या होत्या, असे समोर येत आहे. महाराष्ट्रात ३ मंत्रीपदे (२ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्री).5 / 7यात जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांची नावे चर्चेत होती. तर केंद्रात मोदी मंत्रिमंडळात १ कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी करण्यात आली होती. 6 / 7या फॉर्म्युल्यानुसार अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे या ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेण्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, जेव्हा केंद्रातील मंत्रीपदाचा प्रश्न आला, तेव्हा महाराष्ट्र भाजप नेत्यांनी स्पष्ट केले की, 'केंद्रात मंत्रीपद द्यायचे की नाही, याचा निर्णय पूर्णपणे पंतप्रधान मोदींचा असेल.' या मुद्द्यावर ठोस आश्वासन न मिळाल्याने ही चर्चा थांबली.7 / 7विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान या चर्चेला सुरुवात झाली होती. अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला होता आणि त्यानंतर मुंबईत जयंत पाटील यांच्या निवासस्थानी मध्यरात्री अनेक गुप्त बैठका झाल्या. या बैठकीत एकत्रीकरणाचा रोडमॅप तयार झाला होता, पण अखेर तांत्रिक आणि राजकीय कारणांमुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.