खड्डेच खड्डे! पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांची चाळण, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 14:32 IST2025-05-27T14:29:13+5:302025-05-27T14:32:51+5:30
Mumbai-Goa Highway: पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांची चाळण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांची चाळण झाली असून, आपण रस्त्यावरून प्रवास करतोय की खड्ड्यातून हाच प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. पहिल्याच पावसात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डयांत पाणी साचत असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. (Photo Credit: X/@carvesone)
पहिल्याच पावसानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देखभाल करण्यात येणाऱ्या सर्व्हिस रोडची अवस्था किती वाईट झाली आहे हे उघड झाले आहे. (Photo Credit: X/@carvesone)
लोनेरे या एका छोट्या गावात, जिथे उड्डाणपूल बांधला जात आहे, तिथे मुसळधार पावसामुळे सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहतूक कोडींसारख्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे. (Photo Credit: X/@carvesone)
राष्ट्रीय महामार्ग विभागाने हे रस्ते खडी टाकून बुजवण्याचा प्रयत्न केला असला तरी वाहनचालकांना या रस्त्यावरून जाताना त्रास सहन करावा लागत आहे. (Photo Credit: X/@carvesone)