विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या या नेत्यांची नावे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 10:32 PM2019-10-26T22:32:59+5:302019-10-26T22:44:02+5:30

नुकत्याच आटोपलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रावादी काँग्रेसने चांगले यश मिळवले. काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्याने विरोधीपक्ष नेतेपदासाठी राष्ट्रवादीचा दावा पक्का झाला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची नावे समोर येत आहेत.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव विरोधीपक्षनेतेपदासाठी चर्चेत आहे. अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यास एक आक्रमक विरोधीपक्षनेता विधिमंडळात दिसू शकतो.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नावही विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत आहे.

पंकजा मुंडे यांचा पराभव करत भाजपाला जबरदस्त धक्का देणारे धनंजय मुंडे यांचे नावसुद्धा विरोधीपक्षनेतेपदासाठी आघाडीवर आहे.

राष्ट्रवादीचे आक्रमक नेते जितेंद्र आव्हाड यांचे नावही विरोधीपक्षनेतेपदासाठी चर्चेत आहे.