शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हाहाकार! पूर्व विदर्भाला पुराचा फटका; २०० हून अधिक गावांना तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 10:54 AM

1 / 14
मध्य प्रदेशातील संजय गांधी प्रकल्पाचं पाणी सोडण्यात आल्याचा मोठा फटका पूर्व विदर्भाला बसला आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे.
2 / 14
नागपुरात पेंच (ता. पारशिवनी) आणि तोतलाडोह (ता. रामटेक) या जलाशयांसोबतच चौराई (मध्य प्रदेश) धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यानं पेंच आणि कन्हान नदीला आलेला पूर कायम आहे.
3 / 14
तुमसर, मोहाडी आणि पवनी तालुक्यातील गावांना पडलेला पुराचा विळखा कायम आहे. निम्मं भंडारा शहर जलमय झालं आहे.
4 / 14
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीनं पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
5 / 14
गोंदिया जिल्ह्यातील ३० गावं अद्याप पुराखाली आहेत. हजारो एकर शेतातील पिकं पुराच्या पाण्याखाली आली असून शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे.
6 / 14
पुराचं पाणी सलख भागासह गावांमध्ये शिरल्यानं एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सैन्याच्या जवानांनी नागपूर जिल्ह्यातल्या मौदा, पारशिवनी, कामठी आणि कुही तालुक्यांतील दोन्ही नदीकाठच्या ४८ गावांमधील २६ हजार ४९० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.
7 / 14
भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शिक्षक कॉलनी परिसरात तीन फूट पाणी साचलं होतं. वैनगंगा नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं वाहतुकीला फटका बसला.
8 / 14
चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यातील ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. उत्तर ब्रह्मपुरी पाण्यानं वेढली तर दक्षिण ब्रह्मपुरीचे रस्ते बंद झाले आहेत.
9 / 14
पूर्व विदर्भातील २०१ गावांना पुराचा फटका बसला आहे. ६१ हजार ५९५ नागरिकांना पुराचा तडाखा सहन करावा लागला आहे.
10 / 14
पुराचा तडाखा बसलेल्या नागरिकांसाठी १११ मदत शिबिरं सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये १० हजार २५३ जणांनी आश्रय घेतला आहे.
11 / 14
महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरातमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या राज्यांमधील अनेक भागांतही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
12 / 14
नद्यांमध्ये पाणी पातळी वाढल्यानं अनेक धरणांतून विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये आणि शहरांत पाणी शिरलं आहे.
13 / 14
मध्य प्रदेशातील आठ धरणं १०० टक्के भरली आहेत. नर्मदेला पूर आला आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, गुजरातमधील परिस्थिती बिकट आहे.
14 / 14
राजस्थान, छत्तीसगडमध्येही पावसाचा जोर सुरू आहे. त्याचा फटका शेकडो लोकांना बसला आहे.
टॅग्स :Vidarbhaविदर्भ