Corona Virus Delta 4 Variant: महाराष्ट्राचे टेन्शन वाढले! डेल्टा-4 व्हेरिअंट वेगाने पसरू लागला; देशात आजवर 25 म्युटेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 08:50 AM2021-09-20T08:50:53+5:302021-09-20T09:02:32+5:30

Corona Virus Delta 4 Variant possible Third Wave: रिपोर्टनुसार भारतातच नाही, अमेरिका, युरोपसह अनेक देशांमध्ये म्युटेशन होत आहे. यामुळे व्हायरसमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या वैज्ञानिकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भारतात डेल्टा-४ (Delta 4) च्या कोरोना व्हेरिअंटमुळे तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे. खरेतर डेल्टा-4 व्हेरिअंट वेगाने पसरू लागला आहे. यामुळे वैज्ञानिकांच्या टीमने यावर अलर्ट जारी केला आहे. (Corona Virus Delta 4 Varient spreading fast in Maharashtra.)

या वैज्ञानिकांनी 13 सप्टेंबरला केंद्र सरकारकडे एक रिपोर्ट सोपविला आहे. यानुसार दुसऱ्या लाटेनंतर देशात डेल्टा व्हेरिअंटमध्ये सतत म्युटेशन होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

रिपोर्टनुसार भारतातच नाही, अमेरिका, युरोपसह अनेक देशांमध्ये म्युटेशन होत आहे. यामुळे व्हायरसमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतातच आतापर्यंत डेल्टा व्हेरिअंटने 25 वेळा रुप बदलले आहे. तसेच वेगवेगळ्या रुग्णांमध्ये तो सापडला आहे.

आतापर्यंत 90,115 सँपलचे जिनोम पूर्ण झाले आहे. यामध्ये 62.9 टक्के सँपलमध्ये व्हायरसचे गंभीर व्हेरिअंट मिळाले आहेत. यामध्ये डेल्टा, अल्फा, गामा, बीटा, कप्पा आदी व्हेरिअंट आहेत. जे फक्त दुसऱ्यांदा संक्रमण होण्याची शक्यता वाढवत नाहीत तर लस घेतल्यानंतरही संक्रमित करण्याची ताकद ठेवतात.

भारतात म्यू किंवा सी.1.2 नावाच्या व्हेरिअंटचा एकही रुग्ण सापडलेला नाही. मात्र, डेल्टा आणि डेल्टाशी संबंधीत अन्य म्युटेशन सतत होत आहेत. यामुळे देशात कोरोनामुळे पुन्हा गंभीर परिस्थिती निर्माण हेऊ शकते. कारण सध्या डेल्टा-4 (एवाय.4) चे सर्वाधिक सँपल मिळाले आहेत.

डेल्टाचे जे 25 म्युटेशन मिळाले आहेत, यापैकी डेल्टा 4 चे संक्रमण खूप वेगाने होत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात आणि केरळमध्ये हे म्युटेशन पसरू लागले आहे. कोरोनाच्या आगामी लाटेत याच म्युटेशनचा मोठा वाटा असण्याची शक्यता आहे.

दिल्ली स्थित आयजीआयबीनुसार गेल्या महिन्यात महाराष्ट्रात 44 टक्के रुग्ण हे डेल्टा-4 व्हेरिअंटचे आहेत. केरळमध्ये ही संख्या 30 टक्के आहे. डब्ल्यूएचओने या व्हेरिअंटला गंभीर श्रेणीमध्ये ठेवले आहे.

देशात आधीपेक्षा कोरोनाविरोधी लसीकरण वेगाने होऊ लागले आहे. सर्व राज्यांना आतापर्यंत 78.58 कोटींहून अधिकलस उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच 1.16 कोटी लशी पाठविण्यात येणार आहेत. राज्यांकडे सध्या 5.16 कोटी लशी उपलब्ध आहेत.

कोरोना महामारीविरोधात अधिकाधिक सुरक्षितता मिळविण्यासाठी कोरोना लसीचा बूस्टर डोस लोकांसाठी लवकरच आवश्यक होईल, असा दावा अमेरिकेचे वरिष्ठ संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ.अँथनी फौसी यांनी केला आहे.

इंजेक्शननंतर, कोरोना लसीचा बूस्टर डोस 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना संसर्ग आणि गंभीर आजार होण्यापासून रोखू शकतो.

Read in English