शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भाजपाची आणखी एक खेळी; आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला दिली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2022 5:37 PM

1 / 10
राज्यातील सत्तानाट्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे. तर पक्षाचा आदेश मानून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मागील १० दिवसांपासून सत्तासंघर्ष पाहायला मिळत होता.
2 / 10
राज्यात शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी महाविकास आघाडीची साथ सोडल्याने सरकार धोक्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. मात्र त्यानंतर झालेल्या घडामोडीत भाजपाने शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत जबरदस्त खेळी खेळली.
3 / 10
त्यानंतर आता पुन्हा भाजपानं खेळी खेळली आहे. येत्या ३ आणि ४ जुलै रोजी २ दिवसीय अधिवेशन आहे. या अधिवेशनात शिंदे सरकारला बहुमत चाचणी द्यावी लागणार आहे. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षपदाची निवड केली जाईल.
4 / 10
याच विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपाचा तरूण चेहरा राहुल नार्वेकर यांना पुढे आणले आहे. नार्वेकर यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. एकीकडे शिवसेनेतून आलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद तर दुसरीकडे एकेकाळी शिवसेनेत असलेले नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपद मिळत आहे.
5 / 10
राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत. त्याचसोबत ते मूळचे शिवसैनिक असून आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जायचे. लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
6 / 10
राष्ट्रवादीकडून राहुल नार्वेकर यांनी मावळ लोकसभा निवडणूक लढवली. परंतु शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१६ मध्ये विधान परिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांची निवड झाली.
7 / 10
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल नार्वेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून थेट भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकीटावर नार्वेकरांनी कुलाबा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आणि जिंकली.
8 / 10
राहुल नार्वेकर यांचे वडील सुरेश नार्वेकर हे कुलाबा भागात नगरसेवक होते, तर नुकतेच भाऊ मकरंद नार्वेकर वार्ड क्रमांक २२७ चे नगरसेवक होते. वार्ड क्रमांत २२६ मधून वहिनी हर्षिता नार्वेकर याही नगरसेविका होत्या.
9 / 10
राज्यात २०१९ च्या निकालानंतर ऐतिहासिक अशी घटना घडली. एकमेकांचे विरोधक असलेले शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यात काँग्रेसच्या वाट्याला विधानसभा अध्यक्षपद मिळालं होते.
10 / 10
परंतु दीड वर्षानेच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा देत काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारलं. त्यामुळे हे पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त होते. त्यातच आता विधानसभा अध्यक्षपदासाठी शिंदे आणि भाजपा एकत्र दावा करत आहेत.
टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAditya Thackreyआदित्य ठाकरे