शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

"आम्ही फक्त सतरंज्या उचलणार"; शरद पवारांचा विश्वासू सहकारी माढ्यात अपक्ष लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 7:30 PM

1 / 10
लोकसभा निवडणुकीनिमित्त राजकीय वातावरणही तापलं आहे. त्यात नाराजी, बंडखोरी, पक्षांतर यामुळे महायुती आणि मविआ यांची डोकेदुखी वाढली आहे. माढा मतदारसंघाबाबतही तेच घडलं. याठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील समर्थक नाराज झाले.
2 / 10
धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. परंतु भाजपाने डावलल्याने नाराज मोहिते पाटील समर्थकांनी तुतारी चिन्हावर लढण्याची तयारी केली. धैर्यशील यांनी अलीकडेच शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर तातडीने धैर्यशील मोहिते पाटलांनी राजीनामा दिला.
3 / 10
आता धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात येणार आणि माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली जाणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही बंड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
4 / 10
शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे अभय जगताप यांनी मोहिते पाटलांच्या उमेदवारीच्या चर्चेवरून नाराजी व्यक्त करत आता त्यांच्या गाडीतून आमचे विरोधक इथं येणार प्रचार करणार आणि आम्ही सतरंज्या उचलणार अशा शब्दात तीव्र नाराजी व्यक्त केली.
5 / 10
अभय जगताप म्हणाले की, ही विचारांची लढाई आहे. इंडिया आघाडी विरुद्ध मोदी अशी लढाई आहे. त्यामुळे पक्षाशी आणि विचारांची निष्ठा असलेल्यांना उमेदवादी द्यायला हवी.पण तुम्ही एखादा प्रस्थापित घेऊन त्याला उभं करणार असाल तर ते योग्य होणार नाही असं त्यांनी म्हटलं.
6 / 10
त्याशिवाय मी हे सांगण्याचा भरपूर प्रयत्न केला. परंतु माझी क्षमता साहेबांपर्यंत पोहचली नाही. त्यामुळे माझा विचार साहेबांनी केला नाही असं मला वाटते असं सांगत अभय जगताप यांनी माढा लोकसभा मतदारसंघात अपक्ष उभं राहण्याची तयारी केली आहे.
7 / 10
दरम्यान, नुकतेच शरद पवारांनी एकनाथ खडसेंना घेतले अशी चूक झाली म्हटलं. कदाचित भविष्यात मोहिते पाटलांना घेऊन चूक केली असं म्हटले तरी वावगं ठरणार नाही. ते होऊ शकते. आजतागायत ज्यांची उमेदवारी घोषित होणार त्यांनीही आम्हाला फोन केला नाही. उद्या भविष्यात काय होणार माहिती नाही. आमचे विरोधक त्यांच्या गाडीत बसून इथं येणार आणि आम्ही फक्त सतरंज्या उचलणार अशी नाराजी अभय जगताप यांनी बोलून दाखवली.
8 / 10
शरद पवारांनी अभयदादा जगतापांना उमेदवारी देतील या अपेक्षेने भेटीगाठी दौरे सुरू केले होते. अभयदादांचा विचार होईल..अजूनही शरद पवारांनी आपला निर्णय बदलावा यादृष्टीने आम्ही कार्यकर्ते प्रयत्नशील राहू असं विधान अभय जगपात यांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
9 / 10
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे तीन आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर गेले. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर तसेच मतदारसंघातील इतर नेत्यांनीही शरद पवार यांची साथ सोडली. अशा काळात मोजके नेते शरद पवार यांच्याबरोबर राहिले. त्यामध्ये अभयसिंह जगताप हे एक होते.
10 / 10
मागील सहा महिन्यांपासून त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तयारी केली होती. यासाठी मतदारसंघात विविध कार्यक्रम घेतले. उमेदवारीसाठी शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेतली; पण त्यांना तुमचे नाव चर्चेत आहे एवढेच त्यांना सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात पक्षीय पातळीवर वेगळेच विचार सुरू होते.
टॅग्स :madha-pcमाढाSharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४