शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

"बायडेन, पुतीन कॉन्फरन्स झाली, त्यांनी विचारलं; ये उद्धव ठाकरे कौन है?"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 5:49 PM

1 / 9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत अभूतपूर्व बंडखोरी केली. ४० आमदार आणि १२ खासदारांना सोबत घेतले. यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस यांचे नवीन सरकार आले.
2 / 9
यासंदर्भातील ‘महासत्तांतर’ या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक किस्से सांगितले. यावेळी बिल क्लिंटन विचारतात, एकनाथ शिंदे केवढे काम करतात, खातात कधी अन् झोपतात कधी? असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
3 / 9
त्यावरुन, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवली आहे. तसेच, उद्धव ठाकरेंबद्दल बिल क्लिंटन विचारतात, असेही राऊत यांनी म्हटले.
4 / 9
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, इंग्लंडचे महाराज चार्ल्स यांची सकाळी कॉन्फरेन्स झाली. त्यावेळी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी विचारलं. ये उद्धव ठाकरे कौन है?.
5 / 9
बायडन यांनी पुतीनला प्रश्न केला की, उद्धव ठाकरे है कौन?, याच्यावर एवढी संकटं आली, तरी हा हार मानत नाही, उद्या युद्धाची वेळ आली तर सल्ला घ्यायला हवा, असे संजय राऊत यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
6 / 9
जो बायडन यांनी पुतीनला विचारलं, मोदींना विचारा आम्हाला आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंची भेट का करुन दिली नाही. झेलेन्स्की विचारतात उद्धव ठाकरे कोण आहेत, असे म्हणत राऊत यांनी सांगितले.
7 / 9
युद्धजन्य परिस्थितीवर उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा होत असल्याचं राऊतांनी म्हटलं. तसेच, क्लिंटन यांचा जमाना संपला, हे कळलं पाहिजे, असे म्हणत एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका करत त्यांची खिल्ली उडवली.
8 / 9
काय म्हणाले होते एकनाथ शिंदे - माझ्याकडे गेल्या एक महिन्यापूर्वी एक माणूस आला होता. तो बिल क्लिंटनकडे राहतो. तो खरा भारतीय आहे. पण, त्यांच्याकडे तो आहे. त्याचा नातेवाईक गेला होता.
9 / 9
बिल क्लिंटन त्याला म्हणाले. एकनाथ शिंदे, कोण आहे, केवढे काम करतात, कधी खातात, कधी झोपतात, असा किस्सा एकनाथ शिंदेंनी सांगितला होता. तसेच काही लोकांना वाटले आम्ही संपलो. पण तसे नाही, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला होता.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतJoe Bidenज्यो बायडन