शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांबरोबर अपघातात मृत्यू झालेल्या विदीप जाधवांचा विमा मंजूर, कुटुंबीयांना किती कोटी रुपयांचा आधार मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:40 IST

1 / 5
अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळावर उतरण्यापूर्वीच कोसळले आणि मोठा स्फोट झाला. २८ जानेवारी सकाळी ८.४६ वाजता झालेल्या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांचाही समावेश आहे.
2 / 5
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले विदीप जाधव यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. २००९ मध्ये मुंबई पोलीस दलात विदीप जाधव हे कॉन्स्टेबल म्हणून रूजू झाले होते.
3 / 5
२०१४ ते २०१९ या काळात ते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा पथकामध्ये होते. २०१९ पासून ते अजित पवार यांचे पीएसओ म्हणून कार्यरत होते. पण, २८ जानेवारी रोजी अजित पवारांसोबत बारामतीत पोहचण्यापूर्वीच विमान कोसळले. त्यात अजित पवार, विदीप जाधव आणि इतर तिघांचा मृत्यू झाला.
4 / 5
विदीप जाधव यांनी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा अपघात विमा घेतलेला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर लागणारी सगळी कागदपत्रे आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर त्यांचा १ कोटी ५ लाख रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला. ही रक्कम जाधव यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार ठरणार आहे.
5 / 5
विदीप जाधव यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आहे. ते तरडगावचे रहिवाशी होते. पण, मुंबई पोलीस दलात नोकरी सुरू केल्यानंतर ते कुटुंबासह ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे राहत होते. त्यांना १३ वर्षांची मुली आहे आणि ९ वर्षाचा मुलगा आहे. नेत्रा असे त्यांच्या मुलीचे नाव आहे, तर अव्दित असे मुलाचे नाव आहे.
टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAjit Pawarअजित पवारDeathमृत्यूAccidentअपघात