1 / 6आधार, पॅन किंवा बँक डिटेल्सची गरज नाही : प्रगणक कधीही तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक खात्याची माहिती (ओटीपी इ.) मागत नाहीत. केवळ दिलेल्या प्रश्नांची माहिती द्यायची असते. गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका.2 / 6मोबाइलवर अशी करा स्व-गणना : नागरिकांना आता स्वतःहूनही माहिती भरता येईल. जनगणनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्या मोबाइल नंबरद्वारे नोंदणी करून ३४ प्रश्नांची उत्तरे ऑनलाइन भरता येतात. यामुळे प्रगणकांचा आणि तुमचाही वेळ वाचेल.3 / 6उत्तरांना नकार, खोटी माहिती देणे हा गुन्हा : जनगणना कायदा १९४८ च्या कलम ११ (१) (ड) नुसार प्रगणकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार देणे किंवा हेतुपुरस्सर खोटी माहिती देणे हा अदखलपात्र गुन्हा मानला जातो.4 / 6हजार रुपयांपर्यंत दंड; कैदेची तरतूद : या कलमानुसार दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला एक हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. माहिती देण्यास वारंवार नकार दिल्यास किंवा गंभीर प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीला तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे स्वगणना करताना चुकीची माहिती भरु नये तसेच प्रगणक घरी आल्यानंतर त्याला चुकीची माहिती देऊ नये, अन्यथा चांगेच महागात पडण्याची शक्यता आहे.5 / 6३४ प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक : जनगणनेत प्रगणकांकडून कुटुंबातील व्यक्तींची संख्या, शिक्षण, व्यवसाय, घरातील सुविधा अशा एकूण ३४ विविध प्रश्नांची माहिती घेतली जाणार आहे. ही सर्व उत्तरे अचूक देणे कायद्याने बंधनकारक आहे.6 / 6सर्व प्रक्रिया डिजिटल, नागरिकांची माहिती गोपनीय : यंदाची जनगणना ही आधुनिक पद्धतीने म्हणजेच 'डिजिटल' स्वरूपात होत आहे. नागरिकांनी दिलेली वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. या माहितीचा वापर कोणत्याही वैयक्तिक चौकशीसाठी न करता केवळ सांख्यिकी हेतूने केला जातो.