शेतकऱ्यांनो फार्मर आयडी मिळवला का?; योजनांचा लाभ घेण्यासाठी ठरणार उपयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 17:33 IST2025-02-19T17:24:44+5:302025-02-19T17:33:20+5:30
गावागावांत शेतकरी फार्मर आयडी काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

फार्मर आयडीची नवी संकल्पना सरकारने शेतकऱ्यांसाठी आणली आहे. गावोगावचे शेतकरी ही आयडी काढण्यासाठी पुढे येत आहेत.
तुम्हाला सरकारी योजनांचा लाभघ्यायचा असेल तर फार्मर आयडी असणे आवश्यक असल्याचे महसूल यंत्रणेकडून सांगितले जात आहे.
केंद्र सरकारच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर पब्लिक फॉर अॅग्रिकल्चरअंतर्गत अॅग्रीस्टॅक हा प्रकल्प संपूर्ण देशात राबवण्यात येत आहे.
शासनाने अॅग्रीस्टॅकसाठी १४ ऑक्टोबर रोजी आदेश काढला. त्यानुसार गावागावांत शेतकरी फार्मर आयडी काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
गावपातळीवरील तलाठी शेतकऱ्यांपर्यंत जाऊन कोणतीही शासकीय योजना तसेच पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ फार्मर आयडीशिवाय मिळणार नाही, असे सांगत आहेत. यामुळे संगणकीय युगात शेती क्षेत्रही ऑनलाइन होत आहे.
शेतीचा सातबारा ज्यांच्या नावावर आहे, अशाच शेतकऱ्यांचा फार्मर आयडी काढता येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात सातबाराधारक शेतकरी संख्या ११ लाख ३५ हजार ७४२ इतकी असून, यापैकी दोन लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंद केली आहे. नोंद केलेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळणार आहे.