शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा होऊ शकतो स्फोट ! चार्जिंग करताना काय काळजी घ्याल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 19:43 IST

1 / 5
जर चार्जिग दरम्यान बॅटरीमधून धूर निघताना दिसला किंवा आत गरम वाटली, तर त्वरित वीजपुरवठा बंद करा. बॅटरीला आग लागल्यास त्यावर पाणी टाकण्याऐवजी कोरड्या वाळूचा किंवा अग्निशमन यंत्राचा वापर करावा.
2 / 5
शार्टसर्किटमुळे आग - उन्हाळ्यात लिथियम-आयन बॅटरीमधील सेल जास्त तापतात. यामुळे बॅटरीचा स्फोट होणे किंवा वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे खबरदारी घेणेही तेवढेच महत्वाचे आहे.
3 / 5
पूर्ण डिस्चार्ज वा रात्रभर चार्जिंग धोकादायक - बॅटरीची लेव्हल ५-१० टक्क्यापर्यंत खाली येऊ देऊ नका. तसेच, रात्रभर बॅटरी चार्जिंगला लावून ठेवणे अत्यंत धोकादायक आहे. बॅटरी १०० टक्के चार्ज झाल्यावर चार्जर स्वयंचलितपणे बंद होतो असे म्हटले जात असले तरी, उन्हाळ्यात ओव्हरहाटिंगचा धोका कायम असतो.
4 / 5
ऊन व उष्णतेपासून दूर ठेवा - वाहन थेट उन्हात उभे करणे टाळा. उष्णतेमुळे बॅटरीच्या संवेदनशील भागांवर परिणाम होतो. उन्हाळ्यात वाहन भरउन्हात उभे करणे टाळा. शक्य नसल्यास रिफ्लेक्टिव्ह कव्हर वापर करणे महत्वाचे आहे
5 / 5
ओरिजिनल चार्जर वापरा, पॉवर एक्स्टेंशन टाळा - कंपनीने दिलेल्या मूळ चार्जरचाच वापर करा. स्वस्त किंवा दुसऱ्या कंपनीचा चार्जर बॅटरीच्या 'बीएमएस' ला हानी पोहोचवू शकतो. ईव्हीसाठी जास्त पॉवर लागते. घरातील साध्या एक्स्टेंशन बोर्डमुळे शॉर्टसर्किट होऊन आगी लागण्याचे प्रमाण मोठे आहे.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कारnagpurनागपूरAmravatiअमरावती